बॉक्सर तरुणीची छेड काढली, रोड रोमियाची थेट जिल्हा रुग्णालयात रवानगी

छेड काढलेली ही 18 वर्षीय तरुणी महिला बॉक्सर होती. तिने लोकांसमोर या मुलाला चोप देत थेट रुग्णालयात रवानगी केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय. निशा परवीन असं या तरुणीचं नाव सांगितलं जात असून ती आईसोबत रुग्णालयात आली होती.

muzaffarnagar, बॉक्सर तरुणीची छेड काढली, रोड रोमियाची थेट जिल्हा रुग्णालयात रवानगी

लखनौ : उत्तर प्रदेशात तरुणींना होणारा रोड रोमियांचा त्रास नवा नाही. पण मुजफ्फरनगरमध्ये एका तरुणीने छेड काढणाऱ्या रोमियोला चांगलाच चोप दिलाय. छेड काढलेली ही 18 वर्षीय तरुणी महिला बॉक्सर होती. तिने लोकांसमोर या मुलाला चोप देत थेट रुग्णालयात रवानगी केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय. निशा परवीन असं या तरुणीचं नाव सांगितलं जात असून ती आईसोबत रुग्णालयात आली होती.

तरुणीची छेड काढल्यानंतर या तरुणाला तिने भररस्त्यातच चोप दिला. एक महिला हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. ही महिला निशाची आई असल्याचं बोललं जातंय. घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

निशा महाविद्यालयीन तरुणी असून उत्तराखंडमधील रुरकीमध्ये बॉक्सिंगचं प्रशिक्षणही घेते. विशेष म्हणजे या तरुणाने छेड काढून या मुलीच्या आईला अपशब्द वापरल्याचीही माहिती आहे. यानंतर संतापलेला निशाने छेड काढणाऱ्या तरुणाला ओढलं आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण बॉक्सरच्या हाती सापडलेला हा तरुण पळून जाऊ शकला नाही.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *