देशाचा मूड : 84 टक्के लोक म्हणतात, कलम 370 काढणं मोदींचा मास्टरस्ट्रोक

कलम 370 पासून ते तीन तलाकपर्यंत, काश्मीर प्रश्नापासून ते पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यापर्यंत आणि सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंतचे निवडक असे दहा प्रश्न लोकांना विचारण्यात आले.

देशाचा मूड : 84 टक्के लोक म्हणतात, कलम 370 काढणं मोदींचा मास्टरस्ट्रोक

मुंबई : मोदी सरकारचे 100 दिवस नुकतेच पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nation mood survey Modi government) यांनी काही धाडसी निर्णय घेतले. या निर्णयाबद्दल देशवासियांना काय वाटतं? याच प्रश्नाचं उत्तर टीव्ही 9 मराठी आणि सी-वोटर यांनी जाणून घेतलंय. या सर्व्हेत (Nation mood survey Modi government) मोदींच्या सरकारच्या कारभाराविषयी आणि त्यांच्या निर्णयाविषयी तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कलम 370 पासून ते तीन तलाकपर्यंत, काश्मीर प्रश्नापासून ते पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यापर्यंत आणि सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंतचे निवडक असे दहा प्रश्न लोकांना विचारण्यात आले.

कलम 370 हटवल्यामुळे आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपेल का?

 • हो, नक्कीच – 64.3%
 • हो, काही प्रमाणात – 17.6%
 • नाही- 13.1%
 • माहित नाही – 5%

कलम 370 आणि तीन तलाक कायद्यामुळे नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली का?

 • हो – 84.9%
 • नाही – 13%
 • माहित नाही – 2.1%

मोदी सरकार काश्मीरप्रश्न कायमचा सोडवण्यात यशस्वी होईल?

 • हो – 76.9%
 • नाही – 16.9%
 • माहित नाही – 6.2%

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यात नरेंद्र मोदी यशस्वी होतील?

 • हो – 73%
 • नाही – 14.7%
 • माहित नाही – 12.3%

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला धडा शिकवण्यात मोदी सरकार यशस्वी झालं?

 • हो – 82.5%
 • नाही – 14.4%
 • माहित नाही – 3.1%

पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद केल्यामुळे भारताचे नुकसान होईल?

 • बिलकुल नाही – 50.3%
 • काही प्रमाणात – 33.9%
 • मोठ्या प्रमाणात – 13.9%
 • माहित नाही -1.9 %

भारत-पाकमधील प्रदीर्घ वाद सोडवण्यासाठी युद्ध हाच पर्याय आहे?

 • नाही- 63.3%
 • शेवटचा पर्याय – 23.7%
 • एकमेव पर्याय – 11%
 • माहित नाही – 2%

कलम 370 आणि तीन तलाकमुळे मोदींची मुस्लिमांमधील लोकप्रियता वाढली?

 • हो – 68.4%
 • नाही – 25.2%
 • माहित नाही – 6.4%

आगामी निवडणुकांमध्ये कलम 370 आणि तीन तलाक बंदीचे पडसाद उमटतील?

 • हो – 79%
 • नाही – 14.5%
 • माहित नाही – 6.5%

कलम 370 च्या निर्णयासंदर्भात काँग्रेसच्या संभ्रमाने विरोधक अधिक कमकुवत झाले?

 • हो – 78.9%
 • नाही – 12.2%
 • माहित नाही – 8.9%
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *