Sonia Gandhi : सोनिया गांधी, राहुल गांधींचं टेन्शन वाढणार? मोतीलाल व्होरांनी व्यवहार केल्याचे पुरावे नसल्याचा ईडीच्या सुत्रांचा दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे माजी आणि दिवंगत नेते व्होरा ज्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते, त्या बैठकीबाबतची कागदपत्रे सादर करण्यात ते सर्व नेते अपयशी ठरले.

Sonia Gandhi : सोनिया गांधी, राहुल गांधींचं टेन्शन वाढणार? मोतीलाल व्होरांनी व्यवहार केल्याचे पुरावे नसल्याचा ईडीच्या सुत्रांचा दावा
सोनिया गांधी, राहुल गांधी
Image Credit source: Google
दादासाहेब कारंडे

|

Aug 05, 2022 | 6:01 PM

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Heral Case) आता काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा (Motilal Vora) यांचे नाव समोर येत आहे, ज्यांचे 2020 मध्ये निधन झाले. सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींपासून ते या प्रकरणातील इतर नेत्यांपर्यंत ईडीच्या चौकशीत त्यांचे नाव घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी कोणीही हे सिद्ध करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ईडीच्या चौकशीदरम्यान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सांगितले होते की असोसिएटेड जर्नल लिमिटेड आणि यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सौद्यांमधील सर्व आर्थिक निर्णय मोतीलाल व्होरा यांनी घेतले होते. राहुल आणि सोनिया यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खर्गे आणि पवनकुमार बन्सल यांनीही व्होरांचे नाव ईडीसमोर मांडले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे माजी आणि दिवंगत नेते व्होरा ज्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते, त्या बैठकीबाबतची कागदपत्रे सादर करण्यात ते सर्व नेते अपयशी ठरले.

खरगेंच्या चौकशीतही नाव

यंग इंडिया लिमिटेडचे ​​तेच कर्मचारी असल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलावण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी खरगे यांची ईडीने गुरुवारी सात तास चौकशी केली. अधिवेशनातच एका खासदाराला चौकशीसाठी बोलावणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी राज्यसभेत उपस्थित केला.

राहुल, सोनिया यांचीही आधीच चौकशी

काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्डच्या आवारात असलेले यंग इंडियाचे कार्यालय ईडीने सील केले आहे. ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीने एप्रिलमध्ये खरगे यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी सोनिया गांधी यांचीही तीन दिवस तर राहुल गांधी यांचीही पाच दिवस अशी 50 तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान ईडीसमोर अनेक माहिती समोर आली.

काँग्रेस नेते आक्रमक

मात्र ईडी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असून मोदी सरकार सूडबुद्धीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते रस्त्यावर उतरले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें