पंतप्रधान मोदींवर NDA मधील पक्षप्रमुखांकडून स्तुतीसुमनं

नवी दिल्ली : एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसतंय. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं. शिवाय पुढील पाच वर्षात कामाची गती आणखी वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. एलजेपी प्रमुख राम विलास पासवान यांना अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय …

पंतप्रधान मोदींवर NDA मधील पक्षप्रमुखांकडून स्तुतीसुमनं

नवी दिल्ली : एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसतंय. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं. शिवाय पुढील पाच वर्षात कामाची गती आणखी वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. एलजेपी प्रमुख राम विलास पासवान यांना अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता.

एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राम विलास पासवान यांनी माध्यमांना संबोधित केलं. एनडीएच्या बैठकीअगोदर भाजप मुख्यालयात सर्व केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. तिथेही मोदींचं अभिनंदन करण्यात आलं. या बैठकीनंतर दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएच्या पक्षांची बैठक झाली. एनडीएच्या पक्षांसाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांकडून डिनरचं आयोजन करण्यात आलंय.

एनडीएच्या बैठकीसाठी एकूण 36 पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. तीन पक्षांना काही कारणास्तव उपस्थित राहता आलं नाही, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. एनडीए अगोदरपेक्षा आणखी मजबूत झाली आहे. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणं हे चुकीचं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. शिवाय एनडीए देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षांची यादी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *