BREAKING | घातपाताचा कट उधळला, 5 दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक

दिल्ली पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील 2 दहशतवादी हे पंजाब तर 3 दहशतवादी काश्मीरचे राहणारे असल्याची माहिती मिळतेय. हे सर्व जण बलविंदर सिंह संधू हत्याकांडात सहभागी होते, अशी माहिती मिळत आहे.

BREAKING | घातपाताचा कट उधळला, 5 दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:01 AM

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकानं शरकपूर परिसरात 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये 2 पंजाब तर 3 काश्मीरचे राहणारे आहेत. हे सर्व दहशतवादी इस्लामी आणि खलिस्तानी संघटनांशी जोडले गेलेले आहेत. अनेक दिवसांपासून या दहशतवादांच्या शोधात दिल्ली पोलिस होते, अशी माहिती देण्यात आली आहे. (5 terrorist arrested by Delhi police)

दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमधील 2 दहशतवादी हे पंजाबचे राहणार आहेत. हे सर्व तरनतारन इथं झालेल्या शौर्य चक्र विजेता बलविंदर सिंह संधू हत्याकांडातील सहभागी होते. बलविंदर सिंह संधू यांनी पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात मोठी लढाई लढली होती. अटक करण्यात आलेल्या दहशतावाद्यांकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानाही दहशतवादी संघटना ISIचा पाठिंबा असल्याचीही माहिती मिळत आहे.

दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या पोलिसांवर या दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रास्त्र आणि अन्य काही सामान जप्त केलं आहे. तशी माहिती पोलिसांच्या विशेष विभागाचे DCP प्रमोद कुशवाह यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

भारतात आता 26/11 सारखे दहशतवादी हल्ले होऊ शकत नाहीत; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विश्वास

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

5 terrorist arrested by Delhi police

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.