‘एनआयए’ने राजकीय नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 10 संशयित ताब्यात

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या तोंडावर देशातील काही राजकीय नेत्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने उधळून लावला आहे. यासंबंधीत 10 संशयितांना एनआयएने अटक केली. एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या 17 जागांवर धाड टाकली. यात 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व संशयित हे आयसीस मॉड्यूलचे सदस्य असल्याचं सांगितलं …

NIA, ‘एनआयए’ने राजकीय नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 10 संशयित ताब्यात

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या तोंडावर देशातील काही राजकीय नेत्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने उधळून लावला आहे. यासंबंधीत 10 संशयितांना एनआयएने अटक केली. एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या 17 जागांवर धाड टाकली. यात 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व संशयित हे आयसीस मॉड्यूलचे सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. या संशयितांकडून रॉकेट लाँचर आणि मोठ्या प्रमाणात विस्फोटकं जप्त करण्यात आली. एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अशोक मित्तल यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. हे संशयित विदेशात बसलेल्या नियंत्रकाच्या संपर्कात होते. तसेच हे एक आयसीसचंच मॉड्यूल असल्याचं मित्तल यांनी सांगितले.


या संशयितांकडून एनआयएने रॉकेट लाँचर, धोकादायक शस्त्र, 100 मोबाईल फोन, 135 सिम कार्ड, मेमोरी कार्ड, मोठ्या प्रमाणात विस्फोटकं आणि 7.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच बॅटरी, सल्फर, पोटॅशिअम नायट्रेट, पाईप्स, 150 राऊंड गोळ्या, 8 पिस्टल, शुगर पेस्ट इत्यादी साहित्यही जप्त करण्यात आलं.

‘दिल्लीच्या जाफराबाद येथे राहणारा मुफ्ती सोहेल हा या गँगचा लीडर आहे. सोहेल अमरोह येथून संपूर्ण गँगला सांभाळायचा. त्यांना अनेक बॉम्ब बनवायचे होते. या संशयितांना दिल्लीच्या सीलमपूर, अमरोहा, मेरठ, लखनऊ आणि हापूड या ठिकाणांहून अटक करण्यात आली. चौकशीनंतर यांच्या गँगच्या इतर सदस्यांनाही ताब्यात घेण्यात येईल’, असे मित्तल यांनी सांगितले.

हे सर्व संशयित 20-30 वर्षांचे आहेत. ते सिरिअल बॉम्ब स्फोट करण्याच्या तयारीत होते. काही विशेष ठिकाणं, गर्दीचे ठिकाणं तसेच काही राजकीय नेते त्यांच्या निशाण्यावर होते, असेही मित्तल यांनी सांगितले.

या संशयितांकडून 120 अलार्म घड्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मित्तल यांनी दिली.

या आरोपींमध्ये वेल्डर, रिक्षाचालक, विद्यार्थी असे विविध लोक आहेत. हे मॉड्यूल 3 ते 4 चार महिन्यांआधी सुरु झालं होता, तेव्हापासूनच तपास संस्थेला याची माहिती होती. या संशयितांनी कदाचित लोकल लेव्हलवर ट्रेनिंग घेतल्याचंही सांगितल्या गेलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *