साडेतीन हजार टन सोन्याच्या खाणीचं वृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानं फेटाळलं

सोनगडमध्ये साडेतीन हजार सोनं सापडल्याचा दाव्याला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने फेटाळलं आहे (Gold Mine found in Sonbhadra).

साडेतीन हजार टन सोन्याच्या खाणीचं वृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानं फेटाळलं
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 10:47 PM

लखनौ : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात सोन्याची खाण सापडल्याची माहिती समोर आली होती. या खाणीत साडेतीन हजार टन सोनं असल्याचा दावा केला जात होता. मात्र, हे वृत्त भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) फेटाळले आहे (Geological Survey of India). जीएसआयचे महासंचालक एम. श्रीधर यांनी कोलकाता येथे याबाबत माहिती दिली. “सोनभद्रमध्ये साडेतीन हजार टन सोनं असू शकतं अशी कुठलीही माहिती आम्ही दिलेली नाही”, असं एम. श्रीधर यांनी स्पष्ट केलं.

“उत्तर प्रदेशच्या खनन विभागासोबत जीएसआयने 1988-99 आणि 1999-2000 मध्ये उत्खनन केलं होतं. या भागात काही प्रमाणात धातू मिळू शकतात असं त्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. या सर्वेक्षणात सोनेमिश्रित धातूमधून प्रतिटन 3.03 ग्रॅम सोनं असं एकूण 160 किलो सोनं मिळू शकतं, असं त्या अहावालात सांगण्यात आलं होतं. जीएसआयने हा अहवाल उत्तर प्रदेशच्या खनन विभागाकडे सोपवला होता जेणेकरुन ते पुढील कारवाई करतील”, असं श्रीधर (Geological Survey of India) यांनी सांगितलं.

सोनभद्रचे जिल्हा खाण विभागाचे अधिकारी के. के. रॉय यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) सोनभद्रमधील चोपन ब्लॉकच्या डोंगरात जवळपास 2943.26 टन आणि हरदीमध्ये जवळपास 646 किलो सोनेमिश्रित धातू सापडल्याचा दावा केला होता. यातून 1500 टनच्या आसपास सोनं निघण्याचा अंदाज वर्तवला जात होता.

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.