आता हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही!

लखनऊ : विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. हेल्मेटविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्धनगर जिल्ह्यात येत्या 1 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे. जिल्हाधिकारी ब्रिजेश नारायण सिंह यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. ब्रिजेश नारायण सिंह यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या निर्णयाचं कठोरपणे […]

आता हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

लखनऊ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. हेल्मेटविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्धनगर जिल्ह्यात येत्या 1 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे. जिल्हाधिकारी ब्रिजेश नारायण सिंह यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. ब्रिजेश नारायण सिंह यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या निर्णयाचं कठोरपणे पालन करण्याचे आदेश दिले.

या निर्णयामागील उद्देश काय?

“रस्ते सुरक्षेसंबंधी नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 31 मेनंतर जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल दिलं जाणार नाही”, असं जिल्हाधिकारी ब्रिजेश नारायण सिंह यांनी सांगितलं.

रस्ते अपघातात दररोज वाढ होत आहे. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेटबद्दल जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे, असेही जिल्हाधिकारी ब्रिजेश नारायण सिंह म्हणाले.

नियम मोडल्यास 6 महिन्यांची शिक्षा

“मोटर वाहन अधिनियम कायदा 1988 च्या कलम 129 नुसार, दुचाकी वाहन चालक तसेच मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास कलम 188 अंतर्गत सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते”, असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेट न घालणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं सांगितलं.

या नियमाचे कठोरपणे पालन व्हावे यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, असे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर नजर ठेवता येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातही हेल्मेट सक्ती 

नुकतंच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशकात हेल्मेट सक्ती केली. त्यापूर्वी पुण्यातही हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याला पुणेकरांनी विरोध केला. हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. खरे तर, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे याचं कटाक्षाने पालन व्हायला हवं. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशातील नियमांप्रमाणे पेट्रोल पंपावर हेल्मेटसक्ती करण्याची वेळ लवकरच येण्याची शक्यता आहे.

VIDEO : 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.