बिहारचे सर्व मंत्री मोदीभक्तीत तल्लीन, शहिदाचाही विसर

पाटणा (बिहार) : देशाच्या सीमेवर प्राणाचं बलिदान दिलेल्या शहीद पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव ज्यावेळी पाटणा येथील विमानतळावर आणलं गेलं, त्यावेळी बिहारच्या मंत्रिमंडळातील कुणीही मंत्री उपस्थित नव्हते. हे मंत्री उपस्थित नसण्याचं कारण सुद्धा धक्कादायक आणि संतापजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील पाटणा येथे जाहीर सभा असल्याने, या सभेच्या नियोजनामध्ये मंत्री व्यस्त होते. त्यामुळे एकाही …

बिहारचे सर्व मंत्री मोदीभक्तीत तल्लीन, शहिदाचाही विसर

पाटणा (बिहार) : देशाच्या सीमेवर प्राणाचं बलिदान दिलेल्या शहीद पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव ज्यावेळी पाटणा येथील विमानतळावर आणलं गेलं, त्यावेळी बिहारच्या मंत्रिमंडळातील कुणीही मंत्री उपस्थित नव्हते. हे मंत्री उपस्थित नसण्याचं कारण सुद्धा धक्कादायक आणि संतापजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील पाटणा येथे जाहीर सभा असल्याने, या सभेच्या नियोजनामध्ये मंत्री व्यस्त होते. त्यामुळे एकाही मंत्र्याला शहिदाच्या पार्थिवाला स्वीकारण्यासाठी हजर राहण्यास वेळ मिळाला नाही.

केवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा हे एकमेव राजकीय नेते पाटणा एअरपोर्टवर उपस्थित होते.

नितीश कुमार हे बिहारचे मंत्री असून, भाजपसोबत ते बिहारमध्ये सत्तेत आहेत. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचं मंत्रिमंडळ इतकं व्यस्त होते की, वीरपुत्राचं पार्थिव स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान पिंटू कुमार सिंह शहीद झाले. त्यांचं पार्थिव शनिवारी बिहारमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी पाटणा विमानतळावर कुणीही मंत्री उपस्थित नव्हते.

पाटणा येथे आज नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आहे. या सभेसाठी कालपासूनच नितीश कुमार आणि भाजपचं बिहार मंत्रिमंडळ नियोजनात व्यस्त होते. त्यामुळेच त्यांना शहिदाच्या पार्थिवाला स्वीकारण्यासाठीही वेळ मिळाला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *