विना PUC गाडी चालवत असाल तर हे नियम वाचाच, अन्यथ RC रद्द होणार!

जर तुम्ही विना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राचे (PUC) गाडी चालवत असाल तर तुम्हाला हे महागत पडू शकते. कारण आता विना PUC गाडी चालवताना पकडल्यास तुमच्या गाडीचं नोंदणी प्रमाणपत्रच (RC) रद्द होऊ शकतं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:16 PM, 30 Nov 2020

नवी दिल्ली : जर तुम्ही विना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राचे (PUC) गाडी चालवत असाल तर तुम्हाला हे महागत पडू शकते. कारण आता विना PUC गाडी चालवताना पकडल्यास तुमच्या गाडीचं नोंदणी प्रमाणपत्रच (RC) रद्द होऊ शकतं. सरकारने मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये काही नव्या तरतुदी केल्या आहेत. यानुसार प्रदुषण रोखण्यासाठी PUC चं काटेकोर पालन होणं आवश्यक मानलं जात आहे (No PUC certificate can lead to seizure of vehicle RC from next year).

नियमांचं उल्लंघन केल्यास आरसी बूक जप्त होणार

रस्ता परिवहन मंत्रालयाने अधिसूचना जारी करत म्हटलं आहे, “वाहन चालकाकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास पुढील वर्षी जानेवारीपासून वाहनाचं आरसी बूक जप्त करण्यात येईल. याबाबत रस्ता परिवहन मंत्रालयाने पीयूसीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याआधी यावर सूचना मागवल्या आहेत. तसेच ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागेल असंही म्हटलं आहे.

7 दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास कठोर कारवाई

तपासणी करताना वाहन चालकाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर संबंधिताला हे कागदपत्रं सादर करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मिळेल. या वेळेतही गाडी मालकाने पीयूसी सादर केलं नाही, तर गाडीचं आरसी बूक जप्त करण्यात येईल. याशिवाय 7 दिवसात पीयूसी नुकतणीकरण देखील करावं लागेल.

विशेष म्हणजे पीयूसीसाठी लवकरच एक क्यूआर कोड सिस्टम लागू करण्यात येणार आहे. यात गाडीच्या मालकाचं नाव, नोंदणी क्रमांक आदी सर्व गाडीचे कागदपत्र आणि माहिती असेल.

संबंधित बातम्या :

चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवल्यास जेलमध्ये जाणार

No PUC certificate can lead to seizure of vehicle RC from next year