आता आधार कार्डवर परदेशात जा, व्हिसाची गरज नाही!

मुंबई : आता परदेशात जायचं असल्यास तुम्हाला व्हिसाची गरज नाही. आधारकार्ड असेल, तरी तुम्ही आता परदेशवारी करु शकता, असे दस्तुरखुद्द परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. मात्र, ही परदेशवारी फक्त दोन देशांसाठी असेल. ते दोन देश म्हणजे नेपाळ आणि भूतान. भारताशेजारील नेपाळ आणि भूतानमध्ये तुम्ही आधारकार्ड अधिकृतपणे वापरु शकता. मात्र, यासाठी एक अट आहे. 15 वर्षापेक्षा कमी …

आता आधार कार्डवर परदेशात जा, व्हिसाची गरज नाही!

मुंबई : आता परदेशात जायचं असल्यास तुम्हाला व्हिसाची गरज नाही. आधारकार्ड असेल, तरी तुम्ही आता परदेशवारी करु शकता, असे दस्तुरखुद्द परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. मात्र, ही परदेशवारी फक्त दोन देशांसाठी असेल. ते दोन देश म्हणजे नेपाळ आणि भूतान. भारताशेजारील नेपाळ आणि भूतानमध्ये तुम्ही आधारकार्ड अधिकृतपणे वापरु शकता. मात्र, यासाठी एक अट आहे. 15 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या भारतीय प्रवाशांनाच फक्त आधारकार्ड अधिकृतपणे वापरता येणार आहे.

नेपाळ आणि भूतान या देशांममध्ये जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ठरवून दिलेल्या या दोन्ही वयोगटाऐवजी इतरांना जायचं झाल्यास, आधारकार्ड वापरता येणार नाही. त्यांच्यासाठी व्हिसा अनिवार्य असेल. नेपाळ आणि भूतानला जाण्यासाठी भारतीय नागरिकांकडे वैध पासपोर्ट, भारत सरकारकडून मिळालेले प्रमाणपत्र, याशिवाय मतदान कार्ड असेल तर तुम्हाला व्हिसाची गरज लागणार नाही.

याआधी 65 वर्षापेक्षा जास्त आणि 15 वर्षापेक्षा कमी प्रवाशांसाठी या दोन देशात फिरताना आपली ओळख दाखवण्यासाठी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकार आरोग्य सेवा (सीजीएचएस) कार्ड किंवा रेशन कार्ड दाखवता येत होते. त्यासोबत आता त्यांना आधारकार्डचाही वापर करता येणार आहे.

आता 65 वर्षपेक्षा अधिक आणि 15 वर्षपेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी, नेपाळ आणि भूतानमध्ये आधारकार्डचा वैध प्रमाणपत्र म्हणून वापर करता येणार आहे. तसेच भारतीय नागिरकांसाठी काठमांडूतील भारतीय दूतावासातर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्र भारत आणि नेपाळच्या प्रवासादरम्यान चालू शकत नाही.

नेपाळ आणि भारतीय दूतावासद्वारे देण्यात आलेले इमर्जन्सी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र भारतात परतताना फक्त वापरु शकता, असेही गृहमंत्रालयाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी का?

15 ते 18 वर्षीय तरुण मुलांना शाळेच्या शिक्षकांद्वारे देण्यात आलेले प्रमाणपत्र भारत आणि नेपाळचा प्रवास दरम्यान वापरु शकता. भूतानचा प्रवास करताना भारतीय नागरिकांकडे सहा महिन्यांसाठी सरकारी ओळखपत्रावर वैध असते. यासाठी भारतीय पासपोर्ट किंवा भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले मतदान कार्ड असणे गरजेचे आहे.

भूतान-नेपाळमध्येही भारतीय

भूतान देश भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगालसोबत सीमेला जोडून आहे. तिथे अंदाजे 60 हजार भारतीय नागरिक आहेत. सीमावर्ती भागात दररोज 8 हजार ते 10 हजार मुलं मोलमजुरीसाठी भूतानला येत असतात. परराष्ट्र मंत्रलयाच्या आकड्यानुसार, सहा लाख भारतीय नेपाळमध्ये आहे. नेपाळ भारताच्या पाच राज्यांसोबत जोडून आहे. ज्यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड़सेबत 1850 किलोमीटरपेक्षा जास्त सीमेपर्यंत जोडून आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *