आता ड्रायव्हिंग लायसन्सलाही लागणार 'आधार'

आता ड्रायव्हिंग लायसन्सलाही लागणार 'आधार'

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लवकरच आधार कार्ड हे ड्रायव्हिंग लायसन्ससोबत जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. ते पुढे म्हणाले, आम्ही लवकरच एक कायदा आणत आहोत, ज्यात ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड जोडणे अनिवार्य करणार आहोत.

आज अनेक ठिकाणी अपघात होतात, यावेळी आरोपी व्यक्ती पळ काढते. त्यामुळे त्याला शोधणे कठीण होते. बऱ्याचदा अनेकजण डुप्लिकेट लायसन्स मिळवतात. यामुळे त्यांना यातून वाचण्यात यश मिळते. यासाठी आता आरटीओमध्ये नवीन कार्यप्रणाली सुरु करण्यात येणार आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, ते पुढे म्हणाले, “तुम्ही आधार लिंकेजच्या मदतीने आपलं नाव बदलू शकता. मात्र तुम्ही तुमचं बायोमेट्रिक्स बदलू शकत नाही किंवा फिंगर प्रिंट, म्हणून जेव्हा तुम्ही डुप्लिकेट लायसन्स बनवायला जाता तेव्हा नव्या सिस्टमद्वारे ज्या व्यक्तीकडे लायसन्स आहे का नाही याची माहिती मिळणार आहे. यासाठी आधार कार्ड लायसन्ससोबत जोडणे भविष्यात खूप महत्त्वाचे होणार आहे.”

भारताचे सध्या हे डिजीटल प्रोफाईल आहे. 123 कोटी आधार कार्ड, 121 कोटी मोबाईल फोन, 44.6 कोटी स्मार्टफोन, 56 कोटी इंटरनेट उपभोकर्ता, ई-कॉमर्समध्ये 51 टक्के वाढ झाली आहे. भारतामध्ये 130 कोटी लोकसंख्या आहे. तसेच 2017-18 मध्ये भारतात डिजीटल पेमेंटमध्ये अनेक पटींची वाढ झाली असून 2070 कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहेत. असं ही यावेळी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले.

सरकारनेने नुकतेच आधार कार्डच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर एकूण एक कोटींचा दंड लावला आहे. तसेच जर कोणत्या कंपनीद्वारे नियमांचे उल्लंघन झाले तर एक कोटींच्या व्यतीरिक्त दिवसाला दहा लाखांचा दंडही लावण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आहे. अशी माहिती सुत्रानुसार मिळाली आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *