अजित डोभाल यांच्याकडून हात मिळवण्याऐवजी अमेरिकेच्या मंत्र्यांचं 'खास शैलीत' स्वागत

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाच्या साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातील लोक खबरदारी घेत आहेत. हीच काळजी राष्ट्रीय स्तरावरील अतिमहत्त्वाच्या भेटीगाठींमध्ये देखील पाहायला मिळत आहे.

अजित डोभाल यांच्याकडून हात मिळवण्याऐवजी अमेरिकेच्या मंत्र्यांचं 'खास शैलीत' स्वागत

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाच्या साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातील लोक खबरदारी घेत आहेत. हीच काळजी राष्ट्रीय स्तरावरील अतिमहत्त्वाच्या भेटीगाठींमध्ये देखील पाहायला मिळत आहे. याचा अनुभव आज (27 ऑक्टोबर) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Doval) आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ (Mike Pompeo) आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर (Mark T Esper) यांच्या भेटीत आला. डोभाल यांनी हातात हात घेऊन संसर्गाचा धोका वाढणार असल्याचं लक्षात घेऊन आपल्या हाताचे कोपरे (Elbow Bump) मिळवून स्वागत केलं. या भेटीत शारीरिक अंतर ठेवण्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात आली होती (NSA Ajit Doval exchanged elbow bumps with American Minister Mike Pompeo).

‘टू प्लस टू’ चर्चेच्या या तिसऱ्या स्तरातील चर्चेआधी या अधिकारी आणि नेत्यांमध्ये साऊथ ब्लॉकमध्ये 40 मिनिटांपर्यंत बैठक पार पडली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या अमेरिकेचे हे दोन्ही मंत्री भारतात आले आहेत.

अजित डोभाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री यांच्या भेटीचे काही फोटो समोर येत आहेत. यात डोभाल अमेरिकेच्या नेत्यांचं स्वागत हाताच्या कोपऱ्याला कोपरा लावून करत आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांच्या नाकाला मास्क लावलेला आहे. तसेच पोम्पिओ यांच्या मास्कवर अमेरिकेचा राषट्रध्वज प्रिंट केलेला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराषट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशातील भविष्यातील संबंध मजूबत करण्यासाठी ही भेट महत्वाची ठरणार आहे. या बैठकीच्या वेळी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकरही उपस्थित होते.

भारत आणि अमेरिका या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांना चीनचा धोका असल्याचे अमेरिकेच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले. माईक पोम्पिओ यांच्या सोबत प्रादेशिक आणि जागतिक विषय, कोरोना यासंदर्भात चर्चा झाल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले. माईक पोम्पिओ आणि मार्क एस्पर यांनी नवी दिल्लीमधील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे जाऊन अभिवादनही केले.

हेही वाचा :

अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, स्वातंत्र्य आणि सुरक्षेला चीनचा धोका असल्याचे मत

Unlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी, काय सुरु-काय बंद?

UAPA कायद्याअंतर्गत 18 दहशतवाद्यांची नावं जाहीर, सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन, छोटा शकीलचाही समावेश

NSA Ajit Doval exchanged elbow bumps with American Minister Mike Pompeo

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *