वायूसेनेच्या हल्ल्यापूर्वी बालाकोटच्या कॅम्पवर 300 मोबाईल कार्यरत होते : NTRO

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओकडून देण्यात आली आहे. हल्ला करण्यापूर्वी एनटीआरओकडून याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतरच हल्ल्याला परवानगी देण्यात आली होती. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेनेच्या मिराज […]

वायूसेनेच्या हल्ल्यापूर्वी बालाकोटच्या कॅम्पवर 300 मोबाईल कार्यरत होते : NTRO
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओकडून देण्यात आली आहे. हल्ला करण्यापूर्वी एनटीआरओकडून याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतरच हल्ल्याला परवानगी देण्यात आली होती.

26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील खैबर पंख्तुन्वा प्रांतात असलेल्या बालाकोटमध्ये घुसून एअर स्ट्राईक केली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची कंट्रोल रुम आणि प्रशिक्षण तळावर एक हजार किलो बॉम्ब टाकत वायूसेनेने जैशच्या इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या.

एअर स्ट्राईकमध्ये किती जण मारले गेले याचा कोणताही अधिकृत आकडा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. पण आम्ही टार्गेट उद्ध्वस्त केलं, असं वायूसेनेकडून सांगण्यात आलं होतं. बालाकोटमध्ये बॉम्ब टाकण्यापूर्वी एनटीआरओकडून केलेल्या तपासणीत 300 कार्यरत मोबाईल आढळून आले होते. त्यामुळे 300 दहशतवादी मारल्याच्या दाव्याला बळ मिळालं आहे.

एअर स्ट्राईकवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भारताच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याचे पुरावे सरकारने द्यावेत, अशी मागणी विरोधकांची आहे. त्या पार्श्वभूमीवर एनटीआरओचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. जैश ए मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.