अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत पॉर्न क्लिप सुरु होते तेव्हा…

सरकारी योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पॉर्न क्लिप सुरु झाल्याचा प्रकार घडला. यानंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:05 PM, 4 Jun 2019

जयपूर : राजस्थान सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत धक्कादायक प्रकार घडला. जयपूरमध्ये झालेल्या या बैठकीत अचानक पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. विभागाच्या सचिव मुगधा सिंग यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु असताना हा प्रकार घडला. यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत जवळपास 10 लोकप्रतिनिधी आणि 33 जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी उपस्थित होते. पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरु होताच पॉर्न क्लिप सुरु झाली. यानंतर मुगधा सिंग यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजना आणि त्याची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही बैठक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिली. हा व्हिडीओ कुणी सुरु केला याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असं मुगधा सिंग यांनी सांगितलंय.

VIDEO : 48 तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता