मोदींच्या दौऱ्यावरुन वाद, हेलिपॅडसाठी एक हजार झाडांवर कुऱ्हाड

भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओदिशातील बलांगीर जिल्ह्याचा दौरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या दौऱ्यावेळी बालंगीर परिसरात पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरता हेलिपॅड उभारला जाणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी न घेता जवळपास एक हजार झाडं तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालंगीरच्या वन अधिकारी समीर सत्पथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता तात्पुरता हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्ह्यातील …

मोदींच्या दौऱ्यावरुन वाद, हेलिपॅडसाठी एक हजार झाडांवर कुऱ्हाड

भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओदिशातील बलांगीर जिल्ह्याचा दौरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या दौऱ्यावेळी बालंगीर परिसरात पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरता हेलिपॅड उभारला जाणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी न घेता जवळपास एक हजार झाडं तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालंगीरच्या वन अधिकारी समीर सत्पथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता तात्पुरता हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील अनेक झाडं कापण्यात आली आहेत. आता यासंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र या प्रकरणानंतर पर्यावरणप्रेमींनी मोदींवर जोरदारी टीका केली आहे.

दुसरीकडे ‘जे या यात्रेला घाबरले आहेत, ते वन अधिकाऱ्यांचा गैरफायदा घेत चुकीची माहिती पसरवत आहेत’, असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी केला. धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे आहेत, मात्र सध्या ते मध्यप्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत.

बालंगीरच्या पच्छिम ओडिशा टाऊनमध्ये एक हजार झाडांवर कुऱ्हाड फिरवण्यात आली आहे. ही झाडं भारतीय रेल्वेने  अर्बन प्लँटेशन कार्यक्रमादरम्यान 2016 साली 2.25 हेक्टरच्या क्षेत्रात लावली होती. हेलिपॅड बनवण्यासाठी येथील 1.25 हेक्टरवरील झाडांना कापण्यात आलं आहे. नियमांनुसार या झाडांना कापण्याअगोदर वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच या झाडांना कापण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरेक्षेच्या दृष्टीने झाडं कापणे गरजेचं असल्याचं,  रेल्वे विभागाने सांगितले.

15 जानेवारीला पंतप्रधान मोदी हे ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. आधी ते 16 जानेवारीला जाणार होते, मात्र आता ते 15 जानेवारीला जाणार आहेत. या दरम्यान ते ‘स्वाभिमान समावेश’ सभेला संबोधित करतील. तसेच ते खुर्द-बलांगीर रेल्वे लाईनला हिरवा झेंडा दाखवतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *