...म्हणून दिवाळीपर्यंत कांदा जाणार शंभरीच्या पार; जाणून घ्या 'कारण'

कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

...म्हणून दिवाळीपर्यंत कांदा जाणार शंभरीच्या पार; जाणून घ्या 'कारण'

नवी दिल्लीः देशातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (onion price 1 kg onion in india expected 100 rupees)

कांदा महाग का होत आहे?

महाराष्ट्रातील लासलगावात चांगल्या कांद्याचा बाजारभाव दर क्विंटल 6 हजार 802 रुपयांवर पोहोचला. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत खाली येणार नाहीत?

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. म्हणूनच व्यापा-यांनी होर्डिंगही सुरू केले आहेत. नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईल, तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे हॉटेल आणि ढाबे सुरू करणे. त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून, कांदा महाग होत आहे.

कांदा 2000 रुपये प्रतिक्विंटलने महागला

14 ऑक्टोबरला कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागानं धाडी टाकल्या होत्या. यानंतर व्यापारी बाजारात येत नव्हते. म्हणजेच बाजारातील व्यवसाय ठप्प होता, परंतु सोमवारी बाजार सुरू होताच कांद्याचे दर प्रतिक्विंटल 2000 रुपयांनी वाढले.

कर्नाटकातील कांद्यावर पावसाचादेखील परिणाम

तसेच कर्नाटकात संततधार पाऊस पडल्याने कांद्याच्या पुरवठ्यात घट झाली आहे, त्याचा थेट परिणाम दरावर दिसून येत आहे. चांगल्या आणि वाईट कांद्याची किंमतही वाढली होती. सोमवारी कमाल कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपये, सरासरी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 6200 रुपये आणि खराब दर्जाच्या कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 1500 रुपये होता.

कांद्याची लागवड तीन हंगामात होते

भारतात कांदा लागवडीचे तीन हंगाम आहेत. पहिला खरीप, खरीपनंतर दुसरा आणि तिसरा रब्बी हंगाम. जुलै ते ऑगस्टमध्ये खरीप हंगामात कांद्याची पेरणी केली जाते. खरीप हंगामात पेरणी झालेल्या कांद्याचे पीक ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये बाजारात येते. दुसर्‍या हंगामात कांद्याची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते. जानेवारी-मार्चमध्ये त्याची कापणी केली जाते. कांद्याचे तिसरे पीक म्हणजे रब्बी पीक. ते डिसेंबर-जानेवारीत पेरणी केली जाते आणि मार्च ते मे या काळात कापणी केली जाते. एका आकडेवारीनुसार, कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 65 टक्के रब्बी हंगामात आहे.

बटाट्याच्या किमतींही भडकल्या

देशात नवरात्र सुरू होताच बटाट्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात सामान्य लोक उपवासात बटाट्याचा आहार अधिक सेवन करतात. दिल्ली-एनसीआरसह देशातील ब-याच ठिकाणी बटाटा दर 60 रुपयांच्या पुढे गेला आहे. कोरोना साथीच्या काळात नवरात्री पूजन सुरू झाल्यामुळे बटाट्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशात अतिरिक्त खर्च होत आहे. बाजारात 30 रुपये प्रतिकिलोला उपलब्ध बटाट्याचा भाव बाजारात 50 ते 60 रुपयांवर पोहोचल्याचं व्यापा-यांचे म्हणणे आहे. नवरात्रीतही किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ; किरकोळ बाजारात कांदा नव्वदीपार

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *