रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर सावधान..!; पाकिस्तानची ही आता पुढची चाल

भारतीय सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आता महिला ब्रिगेडची मदत घेण्यात येत आहे. या मुलींच्या माध्यमातून सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानकडून अशा 50 मुलींची टीम तयार करण्यात आली आहे.

रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर सावधान..!; पाकिस्तानची ही आता पुढची चाल
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 8:45 AM

नवी दिल्लीः पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या (ISI) माध्यमातून भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना (Indians Army) लक्ष्य करण्यासाठी विविध योजना आखत आहे. भारतीय सैनिकांना हनी ट्रॅपध्ये (honey trap) अडकवण्यासाठी महिला ब्रिगेड तयार करून त्यांच्याद्वारे कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या संघटनेत 50 मुलींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय गुप्तचर संघटनेकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून हा कुटील डाव रचला जात असल्याने भारतीय गुप्तचर संस्थेकडून लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून हा धोका असल्याने सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अशी सुचनाही भारतीय गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने भारतीय लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे 10 मॉड्यूल तयार केले आहेत. त्यामध्ये 50 पेक्षा जास्त मुली आहेत, तर लष्करात ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने पाकिस्तान या मुलींना हनीट्रॅपचे प्रशिक्षण देत आहे.

पाकिस्तानी महिला एजंट

सैन्य दलातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, हे प्रशिक्षण हैदराबाद, सिंध येथून पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिट 412 द्वारे केले जात आहे. या मॉड्यूलचे लक्ष्य राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लष्करी तळांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांवर आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या या महिला एजंट पाकिस्तानी लष्करात ब्रिगेडियर आणि कॅप्टन या पदावर काम करत आहेत.

ट्रेनिंगनंतर हॉटेलमध्ये रूम बुक

महिला ब्रिगेडला नियुक्त केल्यानंतर पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ट्रेनिंग दिले जात असून ट्रेनिंगनंतर हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर या मुलींना मेक-अप किट दिले जातात. यासोबतच त्यांना रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू, अवनी, मुस्कान आणि हरलीन अशी भारतीय नावंही देण्यात येत आहेत.

भारतीय जवानांना हनीट्रॅप असे केले जाते…

पाकिस्तानी हनीट्रॅप आर्मीच्या एजंट असलेल्या या मुली आधी फेक आयडी बनवून सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर प्रेमाने बोलायला सुरुवात करतात. मैत्रीनंतर ती ज्याला रिक्वेस्ट पाठवलेली असते त्या सैनिकाला लग्नाचे वचन देते. त्या मुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार होतात. त्यामुळे ज्यांना टार्गेट केलेले असते त्या व्यक्ती देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रे त्यांच्या सांगण्यावरून शेअर करण्यासही सहज तयार होतात. गुप्तचर संस्थेच्या मतानुसार जी व्यक्ती हनीट्रॅपमध्ये अडकलेली असते तिला वाटते आपल्या दोघांमधीलच हा संवाद आहे, मात्र या गोष्टीची नोंद पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून घेतली जात असते. मग या सैनिकांना ब्लॅकमेल केले जाते. म्हणजेच जे मागितले ते देण्यास नकार दिल्यास चॅट आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी सुरू होते. त्यामुळे भारतीय गुप्तचर विभागाकडून सैन्य दलातील अधिकाऱ्यांना आणि जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.