आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानची फजिती, कराचीच्या समुद्रात तेलच मिळाले नाही

इस्लामाबाद (पाकिस्तान) : वाढती महागाई, सातत्याने कोसळणारी देशाची अर्थव्यवस्था या सर्वामुळे पाकिस्तानातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच अरबी समुद्रालगतच कराची बंदराजवळ गॅस आणि तेल साठ्यांचे घबाड मिळेल यादृष्टीने पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांनी खोदकाम सुरु केले होते. मात्र या ठिकाणी काहीही हाती न आल्याने इमरान खान यांनी हे खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ‘डॉन’ या इंग्रजी …

आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानची फजिती, कराचीच्या समुद्रात तेलच मिळाले नाही

इस्लामाबाद (पाकिस्तान) : वाढती महागाई, सातत्याने कोसळणारी देशाची अर्थव्यवस्था या सर्वामुळे पाकिस्तानातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच अरबी समुद्रालगतच कराची बंदराजवळ गॅस आणि तेल साठ्यांचे घबाड मिळेल यादृष्टीने पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांनी खोदकाम सुरु केले होते. मात्र या ठिकाणी काहीही हाती न आल्याने इमरान खान यांनी हे खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ‘डॉन’ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 2019 या वर्षाच्या सुरुवातीला अरबी समुद्रालगत कराची बंदराजवळ खनिज तेल आणि गॅसचे सापडल्याचं सांगितलं होते. त्याची घोषणा करताना इमरान खान यांनी “आम्हाला कराची बंदराजवळ खनिज तेल आणि गॅसचे साठे सापडले आहेत. हे साठे इतके प्रचंड आहेत, की यापुढे आम्हाला तेलाची आयात करावी लागणार नाही. तसंच यामुळे पाकिस्तानाची आर्थिक स्थिती सुधारेल. विशेष म्हणजे पाकिस्तानला प्रगतीशील देश होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही”, असेही त्यांनी यावेळी सांगितलं होते.

यानंतर इमरान खान यांनी पाकिस्तानचे तेल आणि पेट्रोलियम मंत्री नदीम बाबर यांना कराची बंदराजवळील केकरा-1 या तेलविहिरात खोदकाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर बाबर यांनी तात्काळ या ठिकाणी खोदकाम सुरु केले. या खोदकामासाठी जवळपास 10 कोटी डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार 700 कोटी रुपये खर्च आला. तर पाकिस्तानला यासाठी तब्बल 1500 कोटी रुपये खर्च करावे लागले.

एवढा खर्च केल्यानंतर हाती काहीतरी लागेल या आशेने पाकिस्तानने साडेपाच हजार मीटर खोदकाम केले. मात्र त्यांना या ठिकाणी काहीही सापडलं नाही. त्यामुळे या ठिकाणी सुरु असलेले खोदकाम थांबवण्यात आल्याचं नुकतंच तेल आणि पेट्रोलियममंत्री नदीम बाबर यांनी स्पष्ट केलं.

‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने या ठिकाणी तब्बल 17 वेळा खोदकाम केलं आहे. सध्या केकरा या तेलविहिरीत सुरु असलेले काम हे चार महिन्यापूर्वी ईएनआई या इटालियन कंपनीकडून सुरु होतं. यात अमेरिकेची एक्सानमोबिल, पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड आणि ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड या कंपन्याही हिस्सेदार आहेत.

याआधीही 1963 मध्ये पाकिस्तानने तेल विहिरीत खोदकाम केले होते. मात्र त्यावेळीही त्यांच्या पदरात निराशा पडली होती. त्यानंतर आताही तेलविहीरीतून घबाड मिळेल या दृष्टीने सुरु केलेले खोदकामातून काहीही साध्य न झाल्याने पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली आहे. विशेष म्हणजे खोदकामावर एवढा खर्च करुनही काहीही न लागल्याने त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ ओढवली आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *