पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुछंमध्येही LoC वर पाकिस्तानची दोन विमानं दिसली. मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं LoC च्या अतिशय जवळ आली होती. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या घुसखोरी करणाऱ्या विमानांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळे भारतीय वायूसेनाही हाय अलर्टवर आहे. रात्री उशिरा आलेल्या पाकिस्तान विमानांचा वेगही […]

पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुछंमध्येही LoC वर पाकिस्तानची दोन विमानं दिसली. मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं LoC च्या अतिशय जवळ आली होती. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या घुसखोरी करणाऱ्या विमानांचा प्रयत्न हाणून पाडला.

पाकिस्तानच्या या घुसखोरीमुळे भारतीय वायूसेनाही हाय अलर्टवर आहे. रात्री उशिरा आलेल्या पाकिस्तान विमानांचा वेगही जास्त होता आणि यावेळी त्यांनी साऊंड बॅरिअरही तोडून दहशत पसरवली. 26 फेब्रुवारीला भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान कुरापती करत आहे.

पाकिस्तानने आजही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. या दरम्यान पाकिस्तानने LoC वर असलेल्या ट्रेड सेंटरवरही हल्ला केला. चक्का दा बागमधील सेंटरवर पाकिस्तानकडून दोन शेल टाकण्यात आले.

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांचे नुकसान होत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानेही आक्रमक असे उत्तर दिले आहे. भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या गोळीबारीमुळे दोन्ही देशांतील व्यापार बंद आहे. यापूर्वीही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील व्यापार थांबवण्यात आला होता. या आकड्यानुसार 26 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर आतापर्यंत पाकिस्तानकडून 80 वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आलं आहे आणि सामान्य जनतेवर निशाणा साधला जात आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.