जयपूर जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या

जयपूर जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या

जयपूर: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा गोळीबार होऊन आणखी 5 जवान शहीद झाले. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला होता.

वाचा: राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: निर्णायक लढाईची वेळ आली!

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्या अशीच मागणी देशभरातून होत आहे. त्याचाच भाग म्हणून देशाच्या विविध जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदीही आक्रमक झाले आहेत. राजस्थानातील जयपूर जेलमध्ये भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केली. शाकीर उल्हा असं या पाकिस्तानी कैद्याचं नाव आहे.

या घटनेची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. मात्र पाकिस्तानी कैद्याच्या हत्येनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

बिकानेरमध्ये अल्टिमेटम

दरम्यान, राजस्थानातील बिकानेरमध्ये पाकिस्तानी नागरिकांना इशारा देण्यात आला होता. बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी तिथे राहणाऱ्या किंवा पर्यटनासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात शहर सोड्याचा इशारा दिला होता. मात्र त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात बुलडाण्याच्या दोन वीरांनाही वीरमरण आलं.

संबंधित बातम्या 

“आणखी एका मुलाला सैन्यात पाठवेन, पण पाकला धडा शिकवा” 

महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा सलाम, निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला   

राजनाथ सिंह TV9 EXCLUSIVE: निर्णायक लढाईची वेळ आली!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *