भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी, अटकेनंतर पाच दिवसांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा निर्णय

चटर्जींच्या एका घरात अशा ठिकाणी पैसे ठेवण्यात आले होते की, ते बघून अनेक अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. बेडरुम, ड्रॉईंग रुममध्ये ठेवले होतेच मात्र सगळ्यात जास्त रक्कम आढळून आली ती त्यांच्या टॉयलेटमध्येच. वॉशरुमच्या बेसिनच्या खाली लॉकर बनवून त्यामध्ये हा सगळा काळा पैसा ठेवण्यात आला होता.

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी, अटकेनंतर पाच दिवसांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा निर्णय
महादेव कांबळे

|

Jul 28, 2022 | 5:21 PM

नवी दिल्लीः ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पार्थ चॅटर्जी यांची आपल्या मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. बंगाल सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee)  आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांची नावे त्या प्रकरणात गोवली गेली आहेत, त्यामुळे ईडीकडून याधीच त्यांना अटक (ED Arrested) करण्यात आली आहे.

पार्थ चटर्जींवर ममता बॅनर्जी सरकारने कारवाई केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरतीत चटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना त्या पदावरुन तात्काळ हटवण्यात आले. पार्थ चटर्जीं यांच्याकडे उद्योग मंत्री होते, ते ज्यावेळी शिक्षण मंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली गेली आहे.

 मंत्री पदावरुन हकालपट्टी

पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार पार्थ चटर्जी यांच्यावर कारवाई केली गेली असून उद्योग मंत्री या पदाबरोबरच बाकीच्या पदावरूनही त्यांना हटवण्यात आले आहे. त्याबरोबरच त्यांची माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज या विभागातूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिक्षक भरतीच्या घोटाळ्यातून काळा पैसा

शिक्षक घोटाळ्याप्रकरणी पार्थ चटर्जी यांना ईडीकडून अटक केली गेली आहे, पार्थ चटर्जी यांना अर्पिता चटर्जीला अटक केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे. अर्पिताच्या घरावर छापेमारी करण्यात आल्यानंतर तिच्या घरात 20 कोटीपेक्षाही जास्त रोख रक्कम तिच्या घरात आढळून आली. तर अर्पिताच्या दुसऱ्या घरावरह छापा टाकण्यात आल्यानंतर तिथेही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आले आहेत. या छापेमारीनंतर ईडीकडून सांगण्यात आले आहे की, हा सगळा पैसा हा शिक्षक भरतीच्या घोटाळ्यातून जमवण्यात आला आहे.

 निव्वळ सोने 4 कोटीचे

मागील वेळी ईडीकडून छापा टाकण्यात आला त्यावेळी त्यांच्या घरामध्ये 21 कोटी 90 लाख रुपये मिळाले होते, तर बुधवारी जेव्हा ईडीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा 27 कोटी 90 लाख रुपये मिळाले होते. तर 4 कोटींपेक्षाही जास्त रक्कमचे सोने त्यांच्या घरात सापडले होते.

चटर्जींच्या बंगाल्यात काय काय मिळाले

चटर्जींच्या घरात मिळाले 27 कोटी 90 लाखाची रोख रक्कम, 6 किलो सोने, अर्धा अर्धा किलोचे असलेले ब्रेसलेट तर तीन किलोची सोन्याची बिस्किट, सोन्याचे पेन मिळाले आहे.

टॉयलेटमध्ये सगळ्यात जास्त पैसे ठेवले

चटर्जींच्या एका घरात अशा ठिकाणी पैसे ठेवण्यात आले होते की, ते बघून अनेक अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. बेडरुम, ड्रॉईंग रुममध्ये ठेवले होतेच मात्र सगळ्यात जास्त रक्कम आढळून आली ती त्यांच्या टॉयलेटमध्येच. वॉशरुमच्या बेसिनच्या खाली लॉकर बनवून त्यामध्ये हा सगळा काळा पैसा ठेवण्यात आला होता.

नोटांनी 20 बॉक्स भरले

त्यांच्या घरात सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांची सगळी रात्र नोटा मोजण्यात निघून गेली होती. चटर्जींच्या घरातील पैसे मोजण्यासाठी मशिन्स मागविण्यात आल्या होत्या. त्याबरोबरच 20 बॉक्स मागवून घरातील 27 कोटी 90 लाख रोख रक्कम ट्रकमध्ये भरुन पाठवण्यात आले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें