‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना

मारियो परेरा यांनी पावलो हॉलिडे मेकर्सच्या ब्रँड अंतर्गत पावलो ट्रॅव्हल्स ही प्रवासी वाहतूक कंपनी सुरु केली. जवळपास गेली वीस वर्षे ही कंपनी दक्षिण भारतासह महाराष्ट्र-गोव्याची ओळख झाली होती.

'पावलो ट्रॅव्हल्स'च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 3:27 PM

पणजी : ‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून प्रवासी बस वाहतुकीचे देशभर जाळे विणणाऱ्या मारियो परेरा यांचे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान गोव्यात त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ‘पावलो कंपनी’च्या बसचालकांनी अनोख्या पद्धतीने मानवंदना देत आपल्या लाडक्या मालकाला अखेरचा निरोप दिला. (Paulo Travels owner Mario Pereira Dies of COVID)

‘म्हापशाचे सुपुत्र’ अशी ओळख असलेल्या मारियो सुकूर परेरा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारही करण्यात येत होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परेरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मायरन असा परिवार आहे.

‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून मारियो परेरा यांनी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता. परेरा यांनी पावलो हॉलिडे मेकर्सच्या ब्रँड अंतर्गत पावलो ट्रॅव्हल्स ही प्रवासी वाहतूक कंपनी सुरु केली. जवळपास गेली वीस वर्षे ही कंपनी दक्षिण भारतासह महाराष्ट्र-गोव्याची ओळख झाली होती. मुंबई-गोवा प्रवास आणि ‘पावलो ट्रॅव्हल्स’ हे जणू समीकरणच झालं होतं.

अनोखी मानवंदना

मारियो परेरा यांचं पार्थिव शववाहिकेतून अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आलं. अंत्ययात्रेच्या वेळी ‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या सर्व लक्झरी बसेस एका रांगेत शववाहिकेच्या मागून सोडण्यात आल्या. बसचालकांनी सलग हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला विशेष मानवंदना दिली. परेरा यांच्या निधनाने गोव्याचा सुपुत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

(Paulo Travels owner Mario Pereira Dies of COVID)

मारियो परेरा यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

हेही वाचा :

भंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू

आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

(Paulo Travels owner Mario Pereira Dies of COVID)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.