नवी दिल्ली: Do Not Disturb (DND) नोंदणीकृत ग्राहकांना SMS आणि कॉल केल्यास संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा मोठा निर्णय केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतलाय. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत या निर्णयावर एकमत झालंय. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार ग्राहकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार संसाधनांशी संबंधित फसव्या कारवायांची चौकशी करण्यासाठी एजन्सींशी समन्वय साधण्यासाठी “डिजिटल इंटेलिजेंस युनिट” अर्थात DIU नोडल एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. (Penalties To The Company For Sending SMS And Calls To DND Registered Customers; Ravishankar Prasad Decision)
दूरसंचार विभागाकडून परवाना व्यवस्थापन क्षेत्र पातळीवर फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेब, मोबाईल अॅप्लिकेशन आणि एसएमएस आधारित प्रणाली विकसित करण्यावर जोर दिला जात आहे. बैठकीत दूरसंचार ग्राहकांना त्रास देणाऱ्यांत सामील असलेल्या व्यक्ती आणि टेलिकॉम कंपन्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश रविशंकर प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.
त्रास देण्याच्या पद्धतीत व्यावसायिक संदेश किंवा कॉल समाविष्ट आहेत. या तसेच दूरसंचार संसाधने आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि सामान्य माणसाला त्याच्या कष्टाच्या पैशांची फसवणूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. अशा प्रकारची कामे रोखण्यासाठी कडक आणि ठोस कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच DND सेवेतील नोंदणीकृत ग्राहकांना मिळत असलेले नोंदणीकृत टेल-मार्केटर म्हणजेच आरटीएम आणि यूटीएम मिळणारे फोन कॉल आणि एसएमएसची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.
दूरसंचार मंत्र्यांनी दूरसंचार कंपन्यांसह दूरसंचार विक्रेत्यांना अधिकाऱ्यांना या विषयाची गंभीरपणे जाणीव करून दिली पाहिजे आणि यासंदर्भात घालून दिलेल्या नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी, जर कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा, टेलि-मार्केटर्सविरुद्ध रविशंकर प्रसाद यांनी “जामतारा आणि मेवात” क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे संचार अवरोधित करणे यासह दूरसंचार स्त्रोतांच्या वापरासंदर्भात फसव्या कारवाया रोखण्यासाठी विशेष रणनीती तयार करण्याचे निर्देशही दिले.
संबंधित बातम्या
रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी नवी भेट, लवकरच जिओ ई-सिम बाजारात दाखल होणार
आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज
Penalties To The Company For Sending SMS And Calls To DND Registered Customers; Ravishankar Prasad Decision