सौदीच्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, पेट्रोल-डिझेल 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता

कच्च्या तेलाची किंमत सध्या आहे तशीच राहिल्यास किंमती वाढू शकतात, असं हिंदुस्तान पेट्रोलियमनेही (एचपीसीएल) म्हटल्याने चिंता आणखी वाढली आहे.

सौदीच्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, पेट्रोल-डिझेल 5 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल कंपनी सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर गेल्या आठवड्यात ड्रोन हल्ला करण्यात आला. यामुळे तेलाच्या किंमती (Petrel Diesel Prices in India) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारतात (Petrel Diesel Prices in India) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 ते 6 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाची किंमत सध्या आहे तशीच राहिल्यास किंमती वाढू शकतात, असं हिंदुस्तान पेट्रोलियमनेही (एचपीसीएल) म्हटल्याने चिंता आणखी वाढली आहे.

क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि ही वाढ अशीच कायम राहिल्यास तेलाच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, अशी प्रतिक्रिया एचपीसीएलचे चेअरमन एम. के. सुराना यांनी रॉयटर्सशी बोलताना दिली. दरम्यान, किंमत वाढली तरी ती कायम राहणार नाही, असंही सुराना यांनी म्हटलंय.

भारतातील तेल कंपन्यांनी आपल्या किंमती मध्य पूर्वमधील गेल्या 15 दिवसातील सरासरी 15 दिवसांच्या बेंचमार्कनुसार निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सौदीतील परिस्थितीचा भारतीय बाजारावरही परिणाम जाणवणार आहे. इराणकडून तेलाची आयात बंद केल्यापासून भारताचं अवलंबत्व सौदीवर जास्त वाढलं आहे.

सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) झालाय. सौदी अरेबियातील या हल्ल्यानंतर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. हुती या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेला इराणचा पाठिंबा असल्याचा आरोप होतोय. सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.

काही महिन्यांपूर्वीच फुटीरतावादी संघटनांनी सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र डागले होते. हुती या संघटनेने काही दिवसांपूर्वी अरामकोच्या प्राकृतिक गॅस केंद्रावरही हल्ला केला होता. या कंपनीवर कायम दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं. 2006 मध्ये अलकायदा या दहशतवादी संघटनेकडून आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, जो अयशस्वी ठरला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *