PM Modi Birthday : देश-विदेशातून शुभेच्छा, या मशिदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदी यांच्यावर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तसेच मोदी यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदी यांच्यावर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तसेच मोदी यांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोलंबो येथील बोहरा मशिदीमध्ये एका विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रार्थना सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि भारताला यश मिळावं यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रपतींपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मोदीजी यांचे प्रयत्न आणि नेतृत्वामध्ये देशानं अनेक मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. मी मोदीजींना चांगलं आरोग्य लाभावं, ते नेहमी आनंदीत राहावेत आणि देशाला त्यांनी एका नव्या उंचीवर न्यावं यासाठी प्रार्थना करते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशा प्रति त्याग, तपस्या आणि समर्पणाचं नाव मोदी आहे. मोदी यांच्या प्रयत्नातून भारताला एक नवी दिशा मिळाली आहे. मोदी यांनी नेहमी देशातील दुर्बल घटक आणि गरीब कुटुंबांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे, असं यावेळी शाह यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनीही दिल्या शुभेच्छा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट करत मोदी यांना शुभेच्छा दिल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यसाठी प्रार्थना करतो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
