भरकार्यक्रमात चिठ्ठी मिळाली, भाषण अर्ध्यावर सोडून मोदी निघाले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर संवेदनशील परिस्थिती बनली आहे. दिल्लीत याबाबत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम सुरु असताना मोदींना एक चिठ्ठी आणून देण्यात आली. त्यांनी भाषण थांबवून चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर भाषण सोडून ते तातडीने निघून गेले. मोदी उच्चस्तरीय बैठकीसाठीच रवाना झाले असावे …

Live Updates, भरकार्यक्रमात चिठ्ठी मिळाली, भाषण अर्ध्यावर सोडून मोदी निघाले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर संवेदनशील परिस्थिती बनली आहे. दिल्लीत याबाबत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम सुरु असताना मोदींना एक चिठ्ठी आणून देण्यात आली. त्यांनी भाषण थांबवून चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर भाषण सोडून ते तातडीने निघून गेले.

मोदी उच्चस्तरीय बैठकीसाठीच रवाना झाले असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. कारण, पाकिस्तानच्या वायूसेनेकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्यात आल्यानंतर दिल्लीतील हालचालींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्रालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मोदींच्या निवासस्थानीही बैठक झाली.

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. एअर स्ट्राईकनंतरचा हा मोदींचा पहिलाच सरकारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जाताच मोदी-मोदीचे नारे लावण्यात आले. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंहही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. बदला घेण्याची भाषा पाकिस्तानकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील नौसेरा भागात पाकिस्तानने विमाने घुसवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडल्याचं बोललं जातंय.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *