16 तारखेपासून लसीकरणाचं महाअभियान, अफवांना आळा घालणं राज्यांचं कर्तव्य : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:55 PM, 11 Jan 2021
PM Modi Meeting

नवी दिल्लीः पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलंय. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. (PM Modi Meeting Live Updates In Marathi January 11 2021 Over Corona Vaccine)

येत्या काही महिन्यांत 30 कोटी लोकांना लसीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय.  कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत, त्या टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिलाय. पंतप्रधान म्हणाले की, अशा अफवांना लगाम घालणे ही राज्यांची जबाबदारी आहे. कोरोना लसीकरणासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण काम करत राहू, आम्ही त्याच दिशेने गेलो आहोत, असंसुद्धा मोदींनी अधोरेखित केलंय.

पीएम मोदी म्हणाले की, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत केलेल्या दोन लसी भारतात तयार केल्या गेल्या आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला लसीकरणाचा अनुभव, दुर्गम भागात पोहोचण्याची व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. 16 जानेवारीपासून आपण देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.  मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोदी म्हणाले, सर्वात आधी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा बलाच्या जवानांना लसीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील लोक आणि जे जास्त करून संवेदनशील आहेत, त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Narendra Modi LIVE | कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्र उचलणार, 3 कोटी लोकांना लसीकरण : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू; कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

PM Modi Meeting Live Updates In Marathi January 11 2021 Over Corona Vaccine