पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

आपण नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की सगळ्यांचे सर्वोच्च हित म्हणजे देशहिताचे आहे. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करतो, केवळ तेव्हाच आपण प्रगती करू शकतो.

पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. (Pm Modi Tribute To Sardar Vallabhbhai Patel)

आपण नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की सगळ्यांचे सर्वोच्च हित म्हणजेच देशाचे हित आहे. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करतो, केवळ तेव्हाच आपण प्रगती करू शकतो. मी अशा राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी, आमच्या सुरक्षा दलाच्या मनोबलासाठी कृपया असे राजकारण करू नका आणि अशा गोष्टी टाळा. आपल्या स्वार्थासाठी आपण जाणूनबुजून किंवा नकळत देशविरोधी शक्तींच्या हातात हात खालून देशाशी खेळू नका, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

यापूर्वी शेजारच्या देशातून आलेल्या बातम्या, तेथील संसदेत ज्या पद्धतीने सत्य स्वीकारले गेले आहे, त्याद्वारे या लोकांचे खरे चेहरे देशासमोर आले आहेत. हे लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचे पुलवामा हल्ल्यानंतर केलेले राजकारण हे उत्तम उदाहरण आहे. पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते. त्यावेळी केली गेलेली विधानं देश विसरू शकत नाही.  राष्ट्रावर असे प्रसंग ओढावलेले असतानाही स्वार्थी आणि अहंकारी राजकारण केले गेले, ते देश कधीही विसरणार नाही.

आज मी येथे निमलष्करी दलाची परेड पाहत असताना माझ्या मनात अजून एक चित्र होते. हे चित्र पुलवामा हल्ल्याचे होते. जगातील सर्व देशांनी, सर्व सरकारांनी, सर्व पंथांनी दहशतवादाविरोधात एकजूट होणे आवश्यक आहे. शांतता, बंधुता आणि परस्पर आदर यांची भावना ही मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद-हिंसाचाराचा कोणालाही कधीही फायदा होऊ शकत नाही.

महर्षी वाल्मिकी यांनी आज भारताचे सांस्कृतिक ऐक्य, आपण अनुभवत असलेला भारत आणि ते सजीव व ऊर्जावान बनवण्याचे कार्य केले आहे. आजचा भारत आपल्या सार्वभौमत्वाच्या आणि सन्मानाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आणि सज्ज आहे. भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. आजच्या भारताचा दृष्टिकोन बदलला आहे, सीमेकडे पाहणा-यांना योग्य उत्तर दिले जात असल्याचंही मोदींनी अधोरेखित केले आहे.

प्रतिकूल परिस्थितीत आम्ही मोठी कामे केली. कलम 370 हटवले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांनी दिलेल्या ऐक्याच्या संदेशामुळे आम्हाला कोरोनासारख्या संकटाशी 8 महिने लढण्याचे सामर्थ्य मिळाले. कोरोना व्हायरस सन्मान करण्यासाठी लोकांनी दिवे लावले. कोरोना महामारीचा सामना करताना या देशातील जनतेने त्यांची इच्छाशक्ती अभूतपूर्व असल्याचे दर्शविले आहे.

संबंधित बातम्या 

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, स्वातंत्र्य आणि सुरक्षेला चीनचा धोका असल्याचे मत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *