देशातील सर्वात लांब पूल, ट्रेन आणि कार एकाचवेळी धावणार

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बोगिबील पूल तयार झाला आहे. या पूलावर रेल्वे आणि गाड्या एकाचवेळी धावताना दिसणार आहेत. ब्रह्मपुत्र नदीवर तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या या सर्वात मोठ्या रेल्वे सह रस्त्याच्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला करणार आहेत. या पुलामुळे अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेजवळ असलेल्या इतर राज्यांमधील रहदारी सूरळीत होणार आहे. 1997 साली […]

देशातील सर्वात लांब पूल, ट्रेन आणि कार एकाचवेळी धावणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बोगिबील पूल तयार झाला आहे. या पूलावर रेल्वे आणि गाड्या एकाचवेळी धावताना दिसणार आहेत. ब्रह्मपुत्र नदीवर तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या या सर्वात मोठ्या रेल्वे सह रस्त्याच्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला करणार आहेत. या पुलामुळे अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेजवळ असलेल्या इतर राज्यांमधील रहदारी सूरळीत होणार आहे. 1997 साली तत्कालीन पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी या पुलाचा पाया रचला होता. तर 2002 साली अटल सरकारमध्ये याचे बांधकाम सुरू झाले होते. हा आशियातील दुसरा सर्वात मोठा पूल असणार आहे. या पुलाला चीनच्या सीमेवरील संरक्षण उपकरणांसाठी महत्वाचे समजले जात आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये-

* या पुलाची लांबी 4.94 किमी आहे. तर हा पूल असम जिल्ह्यातील दिब्रुगढला धमाजीशी जोडणार आहे.

* आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल तीनपदरी असणार आहे. तसेच येथे दुहेरी रेल्वे मार्गही असणार आहे.

* हा डाउन रोड रेल लाइन पूल ब्रह्मपुत्रेच्या पाणीपातळीपासून 32 मीटर उंचीवर आहे.

* अरुणाचल प्रदेश येथून दुरबगढला आणि गुवाहाटीला जाण्यासाठी 500 किमीहून अधिक प्रवास करावा लागतो. या पुलामळे हे अंतर 400 किमीवर येणार आहे.

* बोगिबील पूल भुकंपग्रस्त भागात तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या निर्माणात भूकंपविरोधी तंत्र वापरण्यात आले आहे.

सरकारच्या मते, हा पूल पूर्व विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. चीन सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांसाठी तेझपूरकडून पुरवठा करण्यासाठी काही समस्या आल्यास त्या सोडवण्यासाठी सरकार सक्षम आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.