मोदींची सत्तेतील 19 वर्ष पूर्ण, नेहरूंपासून क्लिंटनपर्यंत तुलना, शुभेच्छांचा वर्षाव

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून आजतागायत ते पंतप्रधानपदावर कायम आहेत.

मोदींची सत्तेतील 19 वर्ष पूर्ण, नेहरूंपासून क्लिंटनपर्यंत तुलना, शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज राज्य आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रमुखपदी राहून 19 वर्षे पूर्ण केली आहेत. नरेंद्र मोदी जवळपास 14 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता 6 वर्षे देशाचे पंतप्रधान या पदावर आहेत. यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उत्सव साजरा करत असून, सर्वच स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आणि 22 मे 2014पर्यंत हे मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून आजतागायत ते पंतप्रधानपदावर कायम आहेत.(pm narendra modi 20 years in government )

भाजपाने आकडेवारी केली जाहीर

भारतीय जनता पक्षाने ट्विटरवर आकडेवारी जाहीर केली असून, त्यामध्ये देशातील प्रमुख पदावर असलेल्या नेत्यांची तुलना मोदींशी केली गेली आहे. तसेच जगात कोणत्या ना कोणत्या पदावर असणार्‍या नेत्याचीही आकडेवारी दाखवण्यात आली आहे. देशातील सर्व नेत्यांची तुलना करून भाजपाने एक पोस्टर प्रसिद्ध केले. नरेंद्र मोदी 4607 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम करत असल्याचे आकडेवारीत सांगण्यात आले. तसेच भारताच्या पंतप्रधानपदी राहून 2334 दिवस झाले आहेत. म्हणजेच एकूण 6941 दिवस पंतप्रधान मोदी कुठल्या ना कुठल्या पदावर कार्यरत आहेत. नरेंद्र मोदी नंतर जवाहरलाल नेहरू हे 6130 दिवस पंतप्रधान राहिले. पंतप्रधान मोदींची तुलना केवळ देशातीलच नाही, तर परदेशी नेत्यांशी केली जाते. बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यक्तींचा यात समावेश आहे. ज्यांनी निरंतर किंवा वेगवेगळ्या वर्षांत पद धारण केले आहे.भाजपा नेत्यांनी केले अभिनंदन

या कर्तृत्वाबद्दल भाजपा नेते सतत पंतप्रधानांचे अभिनंदन करत आहेत. अमित शाहा यांनी लिहिले की, 07 ऑक्टोबर हा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. 2001च्या याच दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या दिवसापासून देशाच्या हितासाठी आणि लोकसेवेला समर्पित केलेला मोदींचा प्रवास विश्रांतीशिवाय सुरूच आहे. गृहमंत्री अमित शाह ट्विट करत म्हणतात, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी राज्यात व आता पंतप्रधान म्हणून देशात विकासाची क्रांती घडवून आणली, कोट्यवधी गरीब, शेतकरी, महिला आणि समाजातील वंचित घटकांना विविध ऐतिहासिक योजना व कामांसह सामर्थ्य दिले. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणले.

यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट केले. त्यांनी लिहिले की, गेल्या 20 वर्षांपासून देशाच्या प्रगतीसाठी अविरतपणे काम करणारे, स्वत:च्या आधी देशाचा विचार, सचोटीने काम करणे, जनकल्याणासाठी गुंतलेले, कर्तव्याचे पालन करणारे, देशाला सातत्यानं प्रगतिपथावर ठेवणाऱ्या नरेंद्र मोदींचे अभिनंदन, अशा भावना योगी आदित्यनाथांनी व्यक्त केल्या आहेत.

 महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

(pm narendra modi 20 years in government )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *