जबरदस्त! 5Gची कमाल! दिल्लीत बसून मोदींनी स्वीडनमध्ये चालवली कार; व्हिडीओ पाहाच

नवा भारत टेक्नॉलॉजीत केवळ ग्राहक बनून राहणार नाही. तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि त्याच्या अंमलबजावणीत भारत सक्रिय राहणार आहे.

जबरदस्त! 5Gची कमाल! दिल्लीत बसून मोदींनी स्वीडनमध्ये चालवली कार; व्हिडीओ पाहाच
5Gची कमाल! दिल्लीत बसून मोदींनी स्वीडनमध्ये चालवली कार; व्हिडीओ पाहाचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 6:40 PM

नवी दिल्ली: देशात आजपासून खऱ्या अर्थाने 5जी (5G Technology) क्रांती सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( PM Narendra Modi) 5जी सेवेचं लोकार्पण केलं. देशातील 130 कोटी जनतेला 5जीच्या रुपाने मोठी भेट मिळाली आहे. 2G,3G,4Gच्या काळात भारताला (india) टेक्नॉलॉजीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु, 5जी सेवा सुरू करून भारताने नवा इतिहास रचला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. एवढंच नव्हे तर, 5जी सेवा लॉन्चिंग करतानाचा मोदींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मोदी 5जी सेवेचा वापर करून दिल्लीत बसून स्वीडनमधील कार चालवताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार चालवण्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. भारत जगाला ड्राइव्ह करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत बसून 5जीच्या सहाय्याने युरोपातील कार चालवण्याची टेस्ट केली, असं कॅप्शन पीयूष गोयल यांनी पोस्टवर दिलं आहे. या कारला यूरोपातील स्वीडनमधील इनडोअर कोर्समध्ये ठेवण्यात आलं होतं. 5जी सेवेद्वारे दिल्लीतून या कारला नेव्हिगेट करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

आज 21व्या शतकात भारताचं सामर्थ आणि सामर्थ पाहण्याचा आज विशेष दिवस आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या ऐतिहासिक कालखंडात 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदली जाणार आहे. 2G,3G,4Gच्या काळात भारताल दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. आता भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असं मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी नव्या भारताचा नवा उल्लेख केला. नवा भारत टेक्नॉलॉजीत केवळ ग्राहक बनून राहणार नाही. तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि त्याच्या अंमलबजावणीत भारत सक्रिय राहणार आहे. भविष्यात वायरलेस तंत्रज्ञान डिझाईन करण्यात, त्याच्याशी संबंधित मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असं मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.