ट्विटरवर मोदींचा बोलबाला, गोल्डन ट्वीट पुरस्कार मोदींच्या नावावर

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्ष 2019 मधील ट्रेंड्स जाहीर केले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लाईक, कमेंट आणि रिट्वीट होणाऱ्या ट्वीटचा समावेश आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:12 PM, 10 Dec 2019

मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्ष 2019 मधील ट्रेंड्स जाहीर केले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लाईक, कमेंट आणि रिट्वीट होणाऱ्या ट्वीटचा समावेश आहे. तसेच ट्विटरने इमोजींची लिस्टही जाहीर केली आहे. ज्याचा भारतीयांनी सर्वाधिक वेळा वापर केला आहे. ट्विटरने राजकीय, मनोरंजनसहीत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील ट्रेंडही जाहीर केले आहेत. या सर्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरकडून 2019 मधील गोल्डन पुरस्कार (Pm Narendra Modi get golden award from twitter) मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वाधिक लाईक आणि रीट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर #VijayiBharat या हॅशटॅगसह 23 मे रोजी एक ट्वीट केले होते. मोदींच्या या ट्वीटला 2019 चा गोल्डन ट्वीट पुरस्कार (Pm Narendra Modi get golden award from twitter) मिळाला आहे. या ट्वीटला आतापर्यंत 117.6 हजार लोकांनी रिट्वीट केले. तसेच 420.6 हजार लोकांनी लाईक केले.

क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीची बाजी

क्रीडा क्षेत्रात टीम इंजियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर बाजी मारली आहे. यामध्ये त्याने क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देताना एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटला सर्वाधिक लाईक आणि रिट्वीट मिळाले होते. आतापर्यंत ते ट्वीट 45.9 हजार लोकांनी पाहिले असून 412.9 हजार लोकांनी लाईक केले आहे.

मनोरंजन क्षेत्रात दाक्षिणात्य चित्रपट बिगिलची बाजी

मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लाईक आणि रिट्वीट दाक्षिणात्य चित्रपट बिगिलच्या ट्वीटला मिळाले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरला सर्वाधिक लाईक आणि रिट्वीट मिळाले आहेत. या चित्रपटाचे पोस्टर तामिळ अभिनेता जोसेफ विजयने शेअर केले होते. त्यांच्या या ट्वीटला सर्वाधिक रिट्वीट केले आहे. विजयच्या या ट्वीटला आतापर्यंत 101.5 हजार लोकांनी रिट्वीट केले आहे.

वर्ष 2019 मधील टॉप पॉलिटिकल हँडल

यामध्ये पहिल्या नंबरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या नंबरवर राहुल गांधी, तिसऱ्या नंबरवर अमित शाह, चौथ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आणि पाचव्या नंबरवर योगी आदित्यनाथ आहेत. तर महिलांमध्ये पहिल्यानंबर स्मृती इराणी, दुसऱ्या नंबरवर प्रियांका गांधी वाड्रा, तिसऱ्या नंबरवर सुष्मा स्वराज, चौथ्या नंबरवर निर्मला सीतारमण आणि पाचव्या नंबरवर ममता बॅनर्जी आहेत.

2019 मधील टॉपचे हॅशटॅग

वर्ष 2019 मध्ये भारतात टॉप हॅशटॅग पाहिले तर पहिल्यानंबरवर #loksabhaelections2019 आहे. या हॅशटॅगसोबत सर्वाधिक ट्वीट झाले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर #chandrayaan2, तिसऱ्या नंबवरवर #cwc19 (क्रिकेट वर्ल्ड कप 2019), चौथ्या नंबरवर #pulwama, पाचव्या नंबरवर #article370, सहाव्या नंबरवर तामिळ चित्रपट #bigil, सातव्या नंबरवर #diwali, आठव्या नंबरवर #avengersendgame, नवव्या नंबरवर #ayodhyaverdict आणि दहाव्या नंबरवर #eidmubarak आहे.