मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, गळ्यातील उपरणाला 11 कोटीची बोली

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'नमामि गंगे' योजनेसाठी पैसे जमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात आला. शनिवारी (14 सप्टेंबर) हा लिलाव सुरु झाला. मोदींच्या या भेटवस्तूंवर लोक आश्चर्यकारक अशी बोली लावताना दिसत आहेत.

मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, गळ्यातील उपरणाला 11 कोटीची बोली

मुंबई : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गंगे’ (Namami Gange Project) योजनेसाठी पैसे जमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आलेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात आला (Bid On Modis Gifts). शनिवारी (14 सप्टेंबर) हा लिलाव सुरु झाला. मोदींच्या या भेटवस्तूंवर लोक आश्चर्यकारक अशी बोली लावताना दिसत आहेत. यावरुन मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता हेच बघा, मोदींच्या गळ्यातील एका उपरणाला एकाने तब्बल 11 कोटी रुपयांची बोली लावली आहे (11 crore bid on Modis Gamchha).

सामान्य लोक जे उपरणं 25-30 रुपयांना विकत घेतात, त्याच उपरणावर 11 कोटींची बोली लागली. यावरुन मोदींची लोकप्रियता लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे दिसून येतं. मोदींच्या या उपरणाची मूळ किंमत 500 रुपये ठेवण्यात आली होती. मोदींच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रभावित होऊन एकाने या उपरणावर लाख-दोन लाख नाही, तर तब्बल 11 कोटी रुपयांची बोली लावली.

त्याशिवाय, या लिलावात पीएसएलव्ही-सी7 च्या धातूपासून बनलेल्या मॉडेलवरही एक कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या मॉडेलची मूळ किंमत दोन हजार रुपये ठेवण्यात आली होती. तर गाय-वासराच्या धातूच्या प्रतिकृतीवर 51 लाखांची बोली लागली आहे.

या भेटवस्तूंचा लिलाव येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत इन्फॉरमेटिक्स सेंटर (एनआइसी)च्या वेबसाईटवरुन होईल. पंतप्रधान म्हणून मोदींनी यापूर्वीही त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात भेटवस्तूंचा लिलाव केला होता. 27 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत ही लिलाव प्रक्रिया चालली होती. यावेळी 4000 पेक्षा जास्त भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावातून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ योजनेला देण्यात आली होती. तेव्हा सर्वात जास्त बोली ही लाकडापासून बनलेल्या बाईकवर लावण्यात आली होती. या लाकडी बाईकवर पाच लाखांची बोली लागली होती.

गेल्या वेळी ऑनलाईनसोबतच लोकांनी इंडिया गेट येथील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए)जाऊन बोली लावली होती. यंदा संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. मात्र, तुम्ही एनजीएमएमध्ये जाऊन हे स्मृती चिन्ह पाहू शकता. रविवारी 100 पेक्षा जास्त लोकांनी एनजीएमएला भेट दिली. यावेळी लिलावासाठी एकूण 2,772 भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या भेटवस्तू मोदींना वेगवेगळ्या ठिकाणी, देश-विदेशातील दौऱ्यादरम्यान देण्यात आल्या आहेत.

भेटवस्तूंची किंमत ठरवण्यात पारदर्शकता

यावेळी सर्वात कमी 200 रुपये किंमत ही गणपतीच्या एका छोट्याश्या मूर्तीची ठेवण्यात आली आहे. तर सर्वात जास्त 2.5 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. यांची किंमत ठरवण्यात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. यामध्ये कला विशेषज्ञांसोबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचीही मदत घेण्यात आली आहे.

या बोलीनंतर उपरणं आणि पीएसएलव्ही-सी7 लिलाव प्रक्रियेतून हटवण्यात आले आहेत. तसेच, या बोलींचा तपास सध्या सुरु आहे. जर या बोली संशयित आढळल्या तर या भेटवस्तूंना पुन्हा लिलाव प्रक्रियेत टाकण्यात येईल.

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन, कोणतं सिमकार्ड वापरतात?

PM Narendra Modi Birthday : नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस

नाशिकमध्ये सभा घेऊन मोदी आठवडाभर देशाबाहेर

देशाचा मूड : 84 टक्के लोक म्हणतात, कलम 370 काढणं मोदींचा मास्टरस्ट्रोक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *