LIVE: सवर्ण आरक्षण एक संधी, देश इमानदारीच्या वाटेवर: मोदी

नवी दिल्ली:  “देशाला भाजपने भितीतून बाहेर काढलं, देश इमानदारीच्या रस्त्यावर आहे, नव्या विश्वासाने देश भजापकडे पाहतोय. सवर्ण आरक्षण म्हणजे तरुणांची इच्छापूर्ती आहे. गरीब तरुणांना संधी आहे. 10 टक्के आरक्षण देशाचा आत्मविश्वास उंचावेल”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. गरीब सवर्णांना 10% आरक्षण हे फक्त …

LIVE: सवर्ण आरक्षण एक संधी, देश इमानदारीच्या वाटेवर: मोदी

नवी दिल्ली:  “देशाला भाजपने भितीतून बाहेर काढलं, देश इमानदारीच्या रस्त्यावर आहे, नव्या विश्वासाने देश भजापकडे पाहतोय. सवर्ण आरक्षण म्हणजे तरुणांची इच्छापूर्ती आहे. गरीब तरुणांना संधी आहे. 10 टक्के आरक्षण देशाचा आत्मविश्वास उंचावेल”, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

गरीब सवर्णांना 10% आरक्षण हे फक्त आरक्षण नाही, ही संधी आहे, ज्यांना गरिबीने संधी मिळत नव्हती त्यांच्यासाठी ही संधी आहे. मात्र काही लोक याविषयी अफवा पसरवून देशात अस्वस्थता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे आरक्षण कुणाचाही हक्क न मारता गरीब सवर्णांना दिलाय, असं मोदी म्हणाले.

वाजपेयींच्या अनुपस्थितीत पहिलं अधिवेशन

मोदी म्हणाले, ” हे पहिलं अधिवेशन आहे जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनुपस्थित पार पडत आहे. पण त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत आहे. विवेकानंद म्हणायचे प्रत्येक देशाचं एक ध्येय असते, त्याला प्राप्त करण्याकरिता प्रत्येकाचं योगदान लागते. भाजपमध्ये हे संस्कार सुरुवातीपासून आहेत”.

भाजपवर देशाचा विश्वास

देशातील 16 राज्यात आपण सत्ता चालवत आहोत किंवा सत्तेचा भाग आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याला मी नमन करतो. गेल्या साडेचार वर्षात जनतेने भाजपवर जो विश्वास दाखवला, ते बघता देशात केवळ भाजपच विकासाची झेप घेऊ शकतो, हा जनतेचा विश्वास आहे.

2000 नंतर अटलजी जर पंतप्रधान झाले असते, तर आज देश आणखी पुढे असता, असं मोदी म्हणाले.

देश इमानदारीच्या मार्गावर

देश इमानदारीच्या मार्गावर चालायला लागला. देशातील लोक स्वतःहून गॅस सबसिडी सोडत आहेत. टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जीएसटीमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. हे सगळं का झालं? कारण त्यांना विश्वास आहे की त्यांचा एक एक पैसा देशाच्या हितासाठी वापरले जात आहे, असं मोदींनी नमूद केलं.

सबका साथ सबका विकास

देश बदलू शकतो हे भारतीयांना दाखवले आहे. भाजप फक्त विकासाच्या मुद्यावर उभा आहे. आमचा एकच मंत्र आहे सबका साथ सबका विकास, असं मोदी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *