एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज; राष्ट्राच्या हितात राजकारण नको, मोदींचं आवाहन

आम्ही त्या जखमांना कधीही विसरू शकत नाही, असंही मोदींनी अधोरेखित केले आहे. (Pm Narendra Modi Speech On Constitution Day Mumbai Terror Attacks)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:12 PM, 26 Nov 2020
narendra modi Mumbai Terror Attacks

नवी दिल्लीः “एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज आहे. राष्ट्राच्या हितात राजकारण नको”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे. राष्ट्रीय हिताच्या कामात राजकारण अडथळा ठरू नये, भारताला एक देश आणि एक निवडणुकीची गरज आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त केवडियामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.(Pm Narendra Modi Speech On Constitution Day Mumbai Terror Attacks)

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित केलं. “आम्ही त्या जखमांना कधीही विसरू शकत नाही, असंही मोदींनी अधोरेखित केले आहे. 2008 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, या हल्ल्यात बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजचा भारत नव्या धोरणासह दहशतवादाचा सामना करीत आहे.

एक राष्ट्र – एक निवडणूक देशासाठी आवश्यक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक राष्ट्र, एक निवडणूक ही आजच्या काळाची गरज आहे. दर काही महिन्यांनंतर देशात कुठेतरी निवडणुका होत असतात, त्यामुळे यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आता आपण संपूर्णपणे डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि कागदाचा वापर थांबविला पाहिजे.
राज्यघटनेचे संरक्षण करण्यात न्यायपालिकेची फार मोठी भूमिका आहे. आणीबाणीच्या कालावधीनंतरही यंत्रणा देखील बळकट झाली, आम्हाला त्यातून बरेच काही शिकायला मिळाले, असंही मोदी म्हणाले आहेत. Pm Narendra Modi Speech On Constitution Day Mumbai Terror Attacks


प्रत्येक नागरिकाला घटनेची माहिती असली पाहिजे आणि त्यानुसार त्याचे पालन केले पाहिजे. कोरोना काळात देशाने निवडणुका घेतल्या, नियमांनुसार एक सरकारसुद्धा स्थापन केले गेले जे घटनेचे सामर्थ्य आहे. आज देश संविधान दिन साजरा करीत आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात मग्न आहे. प्रत्येकाने राष्ट्रीय हित लक्षात घेऊन काम केले पाहिजे. अशा विषयांवर राजकारण असेल तर त्याचा त्रास सहन करावा लागतो. सरदार सरोवर धरणही या राजकारणाचा बळी ठरले. ज्यामुळे धरणाचे काम वर्षानुवर्षे थांबले होते, त्यावरील खर्चात कोट्यवधी रुपयांची वाढ झाली. आज सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभा राहिल्यामुळे आजूबाजूच्या शहराला याचा फायदा झाला, लोकांना रोजगार मिळाल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं आहे.

Pm Narendra Modi Speech On Constitution Day Mumbai Terror Attacks)

संबंधित बातम्या

CORONA UPDATE : 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार?, पीएम केअरचा निधी मोफत लसीकरणासाठी वापरणार का? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न