रेव्ह पार्टीवर छापा, 192 तरुण, 32 तरुणी ताब्यात

नोएडा (दिल्ली) : ग्रेटर नोएडातील फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीवर शनिवारी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 192 तरुण आमि 32 तरुणींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी हुक्का, दारु आणि अमली पदार्थही जप्त केले. ग्रेटर नोएडा येथील महामार्ग पोलिसांना फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा छापा टाकला. यात 200 हून अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. …

रेव्ह पार्टीवर छापा, 192 तरुण, 32 तरुणी ताब्यात

नोएडा (दिल्ली) : ग्रेटर नोएडातील फार्महाऊसवरील रेव्ह पार्टीवर शनिवारी पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 192 तरुण आमि 32 तरुणींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी हुक्का, दारु आणि अमली पदार्थही जप्त केले.

ग्रेटर नोएडा येथील महामार्ग पोलिसांना फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा छापा टाकला. यात 200 हून अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व तरुण दारु आणि अमली पदार्थांच्या नशेत होते.

या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आणि अमली पदार्थांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी छापा मारला तेव्हा येथे हुक्का, दारु आणि ड्रग्ससारखे इतर पदार्थ जप्त केले आहेत.

दरम्यान, रेव्ह पार्टी ज्या फार्म हाऊसवर सुरु होती, त्या फार्म हाऊसचे मालक अमित त्यागी यांनाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपास महामार्ग पोलिसांकडून सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *