लोक म्हणाले, नितीश कुमारांनी मुलगी होईल या भीतीने दुसरं अपत्य होऊ दिलं नाही : तेजस्वी यादव

अपत्यांच्या संख्येवरुन नितीश कुमार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना जोरदार टोले लगावले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:15 PM, 27 Nov 2020

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपत्यांच्या संख्येवरुन नाव न घेता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. आता तो वाद पुन्हा एकदा पोटला असून या मुद्द्यावर बिहारचं राजकारण तापलं आहे. याला प्रत्युत्तर देताना राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना जोरदार टोले लगावले. “नितीश यांच्या या वक्तव्यानंतर लोक म्हणत होते की नितीश कुमार यांनी मुलगी होईल या भीतीने दुसरं अपत्य होऊ दिलं नाही, पण मी प्रचारात तसं म्हणालो नाही. इतक्या अनुभवी मुख्यमंत्र्याला माझ्या बहिणींना राजकारणात ओढणं शोभत नाही,” असं मत तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलं आहे (Political war in JDU Nitish Kumar and RJD Tejaswi Yadav on Birth rate ).

तेजस्व यादव म्हणाले, “बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान काही लोक इतरांची मुलं मोजत होते. एका व्हिडीओत मुख्यमंत्री नितीश कुमार मुलांच्या इच्छेपोटी मुलींना जन्म देत राहिले असं म्हणताना दिसत आहेत. त्यावर मी इतकंच म्हणेल की एका अनुभवी मुख्यमंत्र्याला असं माझ्या बहिणींना राजकारणात ओढणारं वक्तव्य करणं शोभत नाही.”

“लोक तर असंही म्हणत होते की नितीश कुमार यांनी मुलगी होईल या भीतीने दुसरं अपत्यच होऊ दिलं नाही. पण मी निवडणूक प्रचारात तसं काहीही बोललो नाही. त्यावेळी मी त्यांना केवळ याचीच आठवण करुन दिली की माझ्या आई-वडिलांचं सर्वात लहान अपत्य ही मुलगी आहे,” असंही तेजस्वी यादव म्हणाले.

नितीश कुमार म्हणाले, “मी जन्मदरावर बोलताना विनोदाने तसं बोललो. मी तसं बोलताना कुणाचंही नाव घेतलं नाही. लोक तर उगाच स्वतःवर ओढून घेत स्वतःविषयी असा विचार करत आहेत. पण यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली की लोकांना या मुद्द्यावर अशी भावना मनात येते. मी तर अगदी विनोदाने यावर बोललो होतो. जन्मदर कमी करायचा आहे. महिलांचं शिक्षण होईल तेव्हाच जन्मदर कमी होईल. त्याच भावनेने आम्ही काम करत आहोत.”

संबंधित बातम्या :

नितीश कुमारांच्या पहिल्या मंत्र्याचा तीन दिवसात राजीनामा, घोटाळ्याच्या आरोपाने खळबळ

‘बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार’, तेजस्वी यादव यांचं आमदारांना आश्वासन

बिहारमध्ये मृत्यूचे तांडव, 90 हून अधिक मुलांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Political war in JDU Nitish Kumar and RJD Tejaswi Yadav on Birth rate