महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी मारणाऱ्या पूजा पांडेला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला स्टंटबाजी करत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी मारणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचंच अनुकरण करत पूजा पांडेने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीली […]

महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी मारणाऱ्या पूजा पांडेला अटक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला स्टंटबाजी करत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी मारणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचंच अनुकरण करत पूजा पांडेने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीली त्यांच्या पुतळ्यावर गोळी मारली.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारीला महासभेच्या काही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडत असल्याचं दिसतं, त्यानंतर त्या पुतळ्याच्या आतील बाटली फुटून त्यातून लाल रंगाचं रक्तसदृश द्रव्य खाली सांडतं. यावेळी पूजा पांडेसोबतचे लोक नथुराम गोडसेचा जयजयकार करतात. गोळी मारल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाईही वाटली.

हा सर्व प्रकार विकृत असल्याचं मत अनेकांनी मांडलं, तर अनेकांनी पूजा पांडेवर टीकाही केली. या प्रकरणाचा देशातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. तसेच पूजा पांडेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणी पूजा पांडे, तिचा पती अशोक पांडे आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि अखेर पूजा पांडेला आता अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.