चालत्या बाईकवर महिलेने बाळाला जन्म दिला

आतापर्यंत तुम्ही ट्रेन किंवा विमानात लहान मुलांचा जन्म झालेला ऐकलं असले. पण उत्तर प्रदेशमध्ये धावत्या बाईकवर एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

चालत्या बाईकवर महिलेने बाळाला जन्म दिला

लखनऊ : आतापर्यंत तुम्ही ट्रेन किंवा विमानात लहान मुलांचा जन्म झालेला ऐकलं असले. पण उत्तर प्रदेशमध्ये धावत्या बाईकवर एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे  सध्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पण पहिल्यांदाच बाईकवर जन्म दिला असल्याची घटना घडल्याने उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील गावात वेळेवर अँम्ब्युलन्स न आल्याने गरोदर महिलेला बाईकवरुन रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. बाईकवरुन जात असतानाच धावत्या बाईकवर महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

मंगळवारी दुपारी कलवार बुजुर्ग गावात राहणारे कुशल विश्वकर्मा यांची पत्नी लवलीला प्रसुतीकळा सुरु झाल्या. पण जेव्हा त्यांनी टोल फ्री नंबर 102 आणि 108 वर फोन केला. तेव्हा 2 तास झाले तरी अॅम्ब्युलन्स गावात पोहचली नाही. यामुळे नातेवाईकांनी महिलेला बाईकने रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. याच दरम्यान रुग्णालयापासून अवघ्या 40 मीटर अंतरावर असताना महिलेने बाईकवरच बाळाला जन्म दिला, अशी माहिती आरोग्य केंद्राचे चिकिस्ताधिकारी डॉ. ध्रुव कुमार यांनी दिली.

महिलेला रुग्णालयात दाखल करताच तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यानंतर महिलेला आणि तिच्या बाळाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, असं आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *