Congress: एक कुटुंब एक तिकट, पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पदावर राहता येणार नाही, अजय माकन यांची माहिती; काँग्रेसमध्ये लोकशाहीचे वारे

Congress: एक कुटुंब एक तिकट, पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पदावर राहता येणार नाही, अजय माकन यांची माहिती; काँग्रेसमध्ये लोकशाहीचे वारे
पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पदावर राहता येणार नाही, अजय माकन यांची माहिती
Image Credit source: tv9 marathi

Congress: काँग्रेस पक्षाचं ऐतिहासिक चिंतन शिबीर सुरू आहे. त्यासाठी सहा कमिटी तयार केल्या आहेत.

गजानन उमाटे

| Edited By: भीमराव गवळी

May 13, 2022 | 12:07 PM

उदयपूर: पाच राज्यातील निवडणुकांमध्ये आलेल्या दारूण अपयशानंतर आता काँग्रेसमध्ये (congress) लोकशाहीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस संरचनेत मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे नेते अजय माकन (ajay makan) यांनी याबाबतची माहिती दिली. काँग्रेसच्या बैठकीत एक कुटुंब, एक तिकीट हा मुद्दा चर्चेला आला होता. एखाद्या व्यक्तीने पक्षासाठी पाच वर्षे काम केलं असेल त्यांनाच एका कुटुंबात दुसरं तिकीट मिळेल यावर चर्चा झाली. एखादा व्यक्ती कुठल्याही पदावर पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राहणार नाही. जर त्यांना पदावर यायचं आहे त्यांना तीन वर्षे पद सोडावं लागेल. पार्टीच्या अध्यक्षाची निवड आणि चिंतन शिबीर दोन वेगळ्या बाबी आहेत, असं सांगतानाच गेल्या काही वर्षांत लोकशाहीचे (democracy) नवे तंत्र आत्मसात करण्यात आमची विरोधी पार्टी आघाडीवर आहे, आम्ही त्यात मागे पडलो, असं अजय माकन यांनी सांगितलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

काँग्रेस पक्षाचं ऐतिहासिक चिंतन शिबीर सुरू आहे. त्यासाठी सहा कमिटी तयार केल्या आहेत. सहा विषयावर चर्चा करण्यासाठी या समित्या स्थापन केल्या आहेत. काँग्रेस संघटनेमध्ये आवश्यक परिवर्तन आम्ही केलं नाही. पोलिंग बुथ, मंडळ, ब्लॅाक स्तरावरून पासून संघटन परिवर्तनावर चर्चा होणार आहे, असं अजय माकन यांनी सांगितलं.

पक्ष संघटनेत 50 टक्के तरुण दिसणार

काँग्रेसचा एका वेगळा विभाग असेल, जो विभाग फक्त निवडणुक नाही तर नेहमी लोकांमध्ये जाऊन सर्वे करणारस आहे. लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत. चांगलं काम करणाऱ्याला बक्षीस मिळत नाही, खराब काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही. पण यात बदल करुन जे खराब काम करणार त्यांना पदावर ठेवणार नाही. संघटनात्मक अनुशासासन कडक करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक कमिटीत 50 टक्के तरुण कार्यकर्ते असणार आहेत. या मुद्द्यांवर या चिंतन शिबीरात मंथन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

या शिबीरानंतर बदल दिसेल

राजस्थानातील उदयपूर येथे आजपासून काँग्रेस पार्टीचं संकल्प शिबीर सुरू होत आहे. त्यासाठी काँग्रेसचे बडे नेते उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माकन यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसचे नेते तीन दिवस उदयपूरमध्ये राहणार आहेत. काँग्रेससाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पक्षाचं हे शिबीर कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. या शिबीरानंतर अनेक बदल झालेले पाहायला मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें