Pariksha Pe Charcha 2021 : पंतप्रधान मोदींची पालकांना सूचना, अटकाव करण्याऐवजी मुलांना प्रोत्साहित करा

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पंतप्रधान मोदींनी बर्‍याच टिप्सही दिल्या. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पालकांना सल्ला दिला की, मुलांना अटकाव करण्याऐवजी त्यांना उत्तेजन द्या. (Prime Minister Modi's instructions to parents, encourage children instead of inturpting)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:33 PM, 7 Apr 2021
Pariksha Pe Charcha 2021 : पंतप्रधान मोदींची पालकांना सूचना, अटकाव करण्याऐवजी मुलांना प्रोत्साहित करा
पंतप्रधान मोदींची पालकांना सूचना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जगभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी व्हर्च्युअल मोडमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी व्हिडिओ जारी करीत विद्यार्थ्यांना परीक्षा आयुष्यातील स्वप्नांचा शेवट म्हणून नव्हे तर संधी म्हणून पहा असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पंतप्रधान मोदींनी बर्‍याच टिप्सही दिल्या. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पालकांना सल्ला दिला की, मुलांना अटकाव करण्याऐवजी त्यांना उत्तेजन द्या. (Prime Minister Modi’s instructions to parents, encourage children instead of inturpting)

यावेळी ते म्हणाले की, पूर्वीचे पालक मुलांसोबत राहत असत. आता पालक आपल्या करिअरसाठी अधिक दबावात असतात. जेव्हा पालक आपल्या मुलांसमवेत राहतात, तेव्हा मुलांचे मनोबल वाढते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान म्हणाले की मला देशवासीय, पालक, शिक्षकांना सांगायचे आहे की ही केवळ परीक्षेवर चर्चा नाही. घराप्रमाणे संवाद करु.

दबाव टाळा

पंतप्रधान म्हणाले की समस्या तेव्हा येते जेव्हा आपण परीक्षेला आयुष्याच्या स्वप्नांचा शेवट मानतो आणि जीवन-मरणाचा प्रश्न बनवतो. परीक्षा ही जीवन निर्माण करण्याची संधी आहे आणि संधीच्या स्वरूपातच त्याकडे पहा. म्हणूनच मुलांवर अधिक दबाव आणू नका. आपण स्वत:ला परीक्षेत पात्र करण्याच्या संधी शोधत राहिल्या पाहिजेत, जेणेकरून आपण अधिक चांगले करू शकू. आपण यापासून दूर जाऊ नये.

परीक्षा पे चर्चा प्रोग्राम

पंतप्रधान मोदी वर्ष 2018 पासून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करीत आहेत. पहिल्यांदाच दिल्लीतील टाकाटोरा स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी त्यांना सूचना देतात. यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला आहे. याबाबत व्हिडिओ प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी म्हणाले. “यावर्षी मलाही तुम्हाला भेटायचा मोह सोडून द्यावा लागेल.” (Prime Minister Modi’s instructions to parents, encourage children instead of inturpting)