PM Modi : मोदी उद्या देशाला संबोधित करणार, पतंग, फुग्यांपासून वाहनांवर बंदी, लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुप; कसा आहे बंदोबस्त?

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या सोहळ्याला देश विदेशातील महत्त्वाची लोकं उपस्थित राहणार आहेत. एनसीसी कॅडेट आणि इतर विशेष आमंत्रितही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

PM Modi : मोदी उद्या देशाला संबोधित करणार, पतंग, फुग्यांपासून वाहनांवर बंदी, लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुप; कसा आहे बंदोबस्त?
मोदी उद्या देशाला संबोधित करणार, पतंग, फुग्यांपासून वाहनांवर बंदी, लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:07 PM

नवी दिल्ली: उद्या 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव (75 Years Of Independence) साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे उद्या लाल किल्ल्यावरून (Red Fort) देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संबोधनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे लाल किल्ल्याला छावणीचं स्वरुप आलं आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी अत्यंत कडक नियम घालून देण्यात आले आहेत. या परिसरात उद्या पतंग आणि फुगे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही वाहनांनाही या परिसरात प्रवेश निषद्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असून या परिसरातील घटनांवर वॉच ठेवला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या सोहळ्याला देश विदेशातील महत्त्वाची लोकं उपस्थित राहणार आहेत. एनसीसी कॅडेट आणि इतर विशेष आमंत्रितही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी व्हीव्हीआयपीच्या मार्गावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आलं आहे. या शिवाय या परिसरात कोरोना नियमांचंही काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तसेच लाल किल्ला परिसरातील पाच किलोमीटरपर्यंतचं हवाई क्षेत्रही चिन्हित करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

10,000 अधिक पोलिसांचा बंदोबस्त

लाल किल्ल्याच्या परिसरात चेहरा ओळखणारे कॅमेरेही लावण्यात आले आहेत. उद्याच्या कार्यक्रमाला सुमारे सात हजार लोक उपस्थित राहणार आहेत. तसेच लाल किल्ल्याच्या परिसरात दहा हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पतंग उडण्यास बंदी

दिल्ली पोलिसांनी ड्रोन आणि यूएव्ही आदींच्या माध्यमातून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाटी लाल किल्ल्याच्या छतावर आणि इतर संवेदनशील परिसरात 400 हून अधिक लोक तैनात करण्यात आले आहेत. पतंग किंवा कोणत्याही उडणाऱ्या वस्तूंना तात्काळ पकडण्यासाठी हे लोक तैनात करण्यात आले आहेत. ध्वजारोहण करण्यापासून ते लाल किल्ल्याच्या परिसरात नो काईट फ्लाईंग झोन करण्यात आला आहे.

सात हजार पाहुणे येणार

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी देश विदेशातील सुमारे सात हजार पाहुणे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्याच्या आसपास सुरक्षा कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरही एफआरएस कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कॅमेऱ्याच्या फुटेजवर 24 तास लक्ष ठेवलं जाणार आहे.

या वस्तूंवर बंदी

लाल किल्ला परिसरात खाद्यपदार्थ, पाण्याच्या बॉटल, रिमोट नियंत्रित कारच्या चाव्या, धुम्रपानसाठीचे लायटर, बॉक्स, हँडबॅग, कॅमेरा, दुर्बिण, छत्री आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लाल किल्ल्यावरील कार्यक्रम संपेपर्यंत या परिसरात पतंग किंवा फुगे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. असं करणाऱ्याला अटक करण्यात येणार आहे.

या वाहनांवर बंदी

रविवारी रात्री 10 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत दिल्ली बॉर्डरवर कमर्शियल आणि प्रवासी वाहनांच्या येण्याजाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात नोएडा बॉर्डर, लोनी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, गाजीपूर बॉर्डर, बदरपूर बॉर्डर, साफिया बॉर्डर, महाराजपूर बॉर्डर, आया नगर बॉर्डर, औचंडी बॉर्डर, सूर्य नगर बॉर्डर, रजोकरी बॉर्डर, ढांसा बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, कालंदी कुंज बॉर्डर, झरोदा बॉर्डर, भोपुरा बॉर्डर, लाल कुआं पुल प्रह्लाद पूर बॉर्डर आणि टिकरी बॉर्डरचा समावेश आहे. तसेच जीटी रोड, आयएसबीटी कश्मिरी गेट ब्रिज, कौरिया पूल, लाल किल्ला, पुरानी दिल्ली रेलवे स्टेशनसाठीच्या बसमार्गातही बदल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.