देशात लसीकरणाचा वेग दुप्पट करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार

आता भारतात तयार करण्यात येणाऱ्या लसीपैकी निम्मी लस थेट राज्ये आणि रुग्णालयास दिली जातील, असंही नरेंद्र मोदी म्हणालेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:09 PM, 20 Apr 2021
देशात लसीकरणाचा वेग दुप्पट करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
narendra modi

नवी दिल्लीः जगातील सर्वात लसीकरण केंद्र भारतात आहे. जगातील सर्वाधित लसींचं उत्पादन हे भारतात होत आहे. देशात लसीकरणाचा वेग दुप्पट करणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेला संबोधित केलंय. त्यावेळी ते बोलत होते. भारतातील जलदगती 10 कोटी, तर 11 कोटी आणि आता जगात 12 कोटी लस डोस देण्यात आलेत. लसीसंदर्भात काल आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणालाही लसी दिली जाऊ शकते. आता भारतात तयार करण्यात येणाऱ्या लसीपैकी निम्मी लस थेट राज्ये आणि रुग्णालयास दिली जातील, असंही नरेंद्र मोदी म्हणालेत. (Prime Minister Narendra Modi’s decision to double the pace of vaccination in the country)

लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी देण्यास परवानगी मिळाल्यानं शहरांमध्ये आपल्या कामगार वर्गालाही लस उपलब्ध होईल. आपल्या सर्वांचा प्रयत्न केवळ जीव वाचवण्यासाठी नाही तर आर्थिक हालचाली आणि उदरनिर्वाहाची साधनांवर कमीत कमी परिणाम होणे हे सुनिश्चित करणे देखील आहे, असंही नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलंय.

देशातील कोरोना योद्धांचं मला कौतुक

जो त्रास तुम्ही सहन केलाय आणि करताय त्याची मला जाणीव आहे. ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं आहे, त्यांच्यासाठी मी सहवेदना व्यक्त करतो, आव्हान मोठं आहे, परंतु आपल्याला एकत्र मिळून तयारीसह याला पार करायचं आहे. पोलिसांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवलं आहे. देशातील कोरोना योद्धांचं मला कौतुक आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यासाठी योग्य मार्गानं प्रयत्न केल्यास आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही दिवसांत जे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे थोडी सुधारणा आली आहे. देशात ऑक्सिजनची मागणी वाढलीय. त्यावर तेजीनं काम केलं जातं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावर काम सुरू आहे. ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन रेलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात औषधांचं पुरवठा होत आहे. उत्पादन वाढवण्यासाठी औषध निर्मात्या कंपन्यांची मदत घेतली जात आहे. आपल्या देशाकडे सर्वात मजबूत फार्मा सेक्टर आहे. रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्याचंही काम सुरू आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणालेत.

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Bhashan Highlights : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी

PM Narendra Modi Speech : देशात लॉकडाऊन नाहीच, मोदींची मोठी घोषणा, राज्यांसाठीही लॉकडाऊन शेवटचा पर्याय ठेवा

Prime Minister Narendra Modi’s decision to double the pace of vaccination in the country