VIDEO | प्रियांका चोप्रा जिंदाबाद, अतिउत्साही काँग्रेस नेत्याची घोषणाबाजी

'सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद' नंतर काँग्रेस नेते सुरेंद्र कुमार यांनी चुकून प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशी घोषणा दिली.

VIDEO | प्रियांका चोप्रा जिंदाबाद, अतिउत्साही काँग्रेस नेत्याची घोषणाबाजी

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांडच्या नावाचा जयघोष करताना उत्साहाच्या भरात काँग्रेस नेत्याने चांगलाच घोळ घातला. प्रियांका गांधी वढेरा यांच्याऐवजी ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’ (Priyanka Chopra zindabad) अशी घोषणा दिल्यामुळे हे महाशय ट्रोलिंगचा विषय ठरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांच्या उपस्थितीत एक रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस नेते सुरेंद्र कुमार यांनी माईकचा ताबा घेतला आणि घोषणाबाजी सुरु केली. ‘सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद’ इथपर्यंत सर्व ठीक होतं. कुमार यांच्यामागोमाग प्रेक्षकांमधूनही घोषणेचा पुनरुच्चार होत होता.

अचानक प्रियांका गांधी वढेरा यांच्याऐवजी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’ असा नारा दिला. प्रियांका चोप्रा असं ऐकताच स्टेजवर उभे असलेले प्रदेशाध्यक्षही चमकून पाहताना दिसले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्वीट केलेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच काँग्रेस पक्ष ट्रोलिंगचा विषय ठरला. इतकंच नाही, तर प्रियांका चोप्राही काही न करता थोड्या वेळासाठी ट्विटरवर ट्रेण्डिंग टॉपिक ठरली.

प्रियांका चोप्राने काँग्रेसमध्ये प्रवेश (Priyanka Chopra zindabad) केला की काय, अशा कुत्सित प्रतिक्रिया काही ट्विटराईट्सनी दिल्या. तर नशिब ‘राहुल बजाज जिंदाबाद’ नाही बोललात, असा टोमणा एका ट्विटर युझरने लगावला, कारण भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर आगपाखड केल्याने उद्योजक राहुल बजाजही चर्चेचा विषय ठरले होते.

Priyanka Chopra zindabad

वाचा : खंडणी उकळल्याप्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्री अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *