VIDEO : प्रियांका गांधींनी 'कोब्रा' पकडला

रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्‍तर प्रदेशच्या रायबरेली मतदार संघात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधींचा प्रचार करत आहेत. आज त्यांनी रायबरेलीतील पुरवा गावामध्ये गारुडी समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्या वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्क कोब्रा हातात पकडला. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. प्रियांका गांधींनी गारुडी समाजाशी चर्चा करताना त्यांच्याजवळील सापांचीही पाहणी केली. त्यावेळी …

VIDEO : प्रियांका गांधींनी 'कोब्रा' पकडला

रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्‍तर प्रदेशच्या रायबरेली मतदार संघात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधींचा प्रचार करत आहेत. आज त्यांनी रायबरेलीतील पुरवा गावामध्ये गारुडी समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्या वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्क कोब्रा हातात पकडला. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले.


प्रियांका गांधींनी गारुडी समाजाशी चर्चा करताना त्यांच्याजवळील सापांचीही पाहणी केली. त्यावेळी प्रियांका यांनी गारुडींकडे असलेल्या कोब्रासह अनेक सापांना हातात घेतलं. हे पाहून त्यांच्या मागे उभे असणाऱ्यांनी त्यांना सावध केले. तेव्हा तो काहीही करणार नाही, तुम्ही का घाबरत आहात, अशी विचारणा प्रियांका यांनी केली.

प्रियांका गांधींनी ज्या सहजपणे सापांना हाताळले हे पाहून उपस्थितांपैकी अनेकजण अवाक् झाले. गारुड्यांशी चर्चा करताना प्रियांका गांधींनी त्यांच्याकडून सापांच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेतली. तसेच तेथे असलेला कोणता साप चावू शकतो असेही विचारले. त्यावर गारुड्यांनी त्यांना याचीही माहिती दिली.

“पाय पकडून एकनिष्ठपणाच्या शपथा खाणारे आज आईविरोधात”

या भेटीनंतर प्रियांका गांधींनी रायबरेलीत सोनिया गांधींसाठी प्रचारसभाही घेतली. त्यांनी आपल्या भाषणात सोनिया गांधीच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार दिनेश सिंह यांच्यावर हल्ला चढवला. दिनेश सिंह याआधी काँग्रेसमध्येच होते. ते गांधी कुटुंबाच्या खूप जवळचे मानले जायचे. प्रियांका गांधी म्हणाल्या, “कालपर्यंत जे पाय पकडून एकनिष्ठ असल्याच्या शपथा खात होते, ते आज माझ्या आईविरोधात निवडणूक लढवत आहेत.”

‘भाजपने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले’

भाजपचे खरे रुप देशासमोर आले आहे. नोकऱ्या देण्याऐवजी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी भाजपने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, अशी घणाघाती टीका प्रियांका गांधींनी केली. अंगणवाडी कामगारांच्या समस्याही कोणी समजून घेत नाही, असेही त्या म्हणाल्या.

‘मोदी वारणसीतील कोणत्याही गावात गेले नाही’

प्रियांका म्हणाल्या, “मी वाराणसीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील कोणत्याही गावात गेलेले नाहीत. मोदींनी या गावातील कुणाचीही विचारपूस केली नाही आणि त्यांचा विकास कसा होत जात आहे याचीही चौकशी केली नाही. दुसरीकडे सोनिया गांधींनी त्या आजारी असतानाही या गावांमध्ये जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्या अशाप्रकारच्या नेत्या आहेत.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *