40 जवानांचा जीव घेणाऱ्या 21 वर्षीय दहशतवाद्याचे आई-बाप काय म्हणतात?

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं गुरुवारी 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) या 21 वर्षीय दहशतवाद्याने हल्ला केला. आदिल डार हा मूळ काश्मीरचाच रहिवासी होता. त्याने एक आयईडी स्फोटाने भरलेली गाडी जवानांच्या गाडीवर ठोकून हा हल्ला केला. या भीषण स्फोटात तब्बल […]

40 जवानांचा जीव घेणाऱ्या 21 वर्षीय दहशतवाद्याचे आई-बाप काय म्हणतात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं गुरुवारी 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) या 21 वर्षीय दहशतवाद्याने हल्ला केला. आदिल डार हा मूळ काश्मीरचाच रहिवासी होता. त्याने एक आयईडी स्फोटाने भरलेली गाडी जवानांच्या गाडीवर ठोकून हा हल्ला केला. या भीषण स्फोटात तब्बल 40 जवान शहीद झाले.

आदिल डारच्या या कृत्याने देशभरात संतापाची लाट आहेच, शिवाय त्याचं कुटुंबही त्याच्या या कृत्याने हादरुन गेलं आहे.  कोणीही माणूस दुसऱ्या माणसाचा जीव कसा घेऊ शकतो, असा प्रश्न डार कुटुंबीयांचे नातेवाईक अब्दुल राशिद यांना पडला आहे.

आदिला डार घरातून गेला ते परतलाच नाही

राशिद यांनी 21 वर्षीय दहशतवादी आदिल डारची पार्श्वभूमी सांगितली. आदिलने शिक्षण सोडून तो बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत होता. गेल्या वर्षी 19 मार्चला तो त्याचा भाऊ समीर डारसोबत गायब झाला होता. त्यावेळी त्याने आपण मित्राला भेटायला जात असल्याचं सांगितलं होतं. सायकल घेऊन गेलेला आदिल डार परतलाच नाही. त्याच्या आई-वडिलांनी आदिल डार गायब झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

कुटुंबीयांचा आदिल डारसाठी व्हिडीओ संदेश

आपला मुलगा आदिल डार हा दहशतवाद्यांच्या टोळीत सहभागी झाल्याची बातमी आई वडिलांना काही दिवसांनी मिळाली. हे ऐकून त्यांना झटकाच बसला. त्यांनी एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मुलगा आदिल डारला घरी परतण्याची विनवणी केली. मात्र आदिल डार खूप पुढे निघून गेला होता.

आदिल डार हा गुलाम हसन डार यांचा दुसरा मुलगा होता. आदिलचे वडील गुलाम हसन हे पुलवामा इथं घरोघरी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा सुतारकाम करतो, तर छोटा मुलगा शिकत आहे.

बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर आदिल दहशतीच्या वाटेवर

आदिल डार इतका कट्टर कसा बनला हे प्रश्न कुटुंबीयांनाही सतावत होता. राशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल डार हा 2015 मध्ये आदिल हाफिज झाला. त्याला संपूर्ण कुराण तोंडपाठ होतं. धर्माच्या बाजूने तो झुकला होता. 2016 मध्ये बुऱ्हाण वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक झाली होती. त्या दगडफेकीदरम्यान आदिलच्या पायाला पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतरच कदाचित तो कट्टरपंथी झाला असावा असं राशिद यांनी सांगितलं.  इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

संबंधित बातम्या

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?  

Pulwama Attack : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो? 

माय फ्रेंड मोदी, आय अॅम विथ यू, इस्रायलच्या पंतप्रधानांचा जाहीर पाठिंबा  

मी मोदींचा राजीनामा मागणार नाही: शरद पवार 

Pulwama Attack: सलाम!! बुलडाण्याचे दोन वीर धारातीर्थी!  

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.