Pulwama Attack: कुणाचं घड्याळ, कुणाचं पाकीट, छिन्नविछिन्न जवानांची ओळख कशी पटली?

नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या 40 शहीद जवानांची ओळख त्यांचे आधार कार्ड, आयडी कार्ड आणि इतर सामानांच्या माध्यमातून करण्यात आली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवानांचे शरीर अक्षरश: छिन्न-विछिन्न अवस्थेत विखुरले गेले. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे खूप कठिण झाले होते. त्यामुळे या …

Pulwama Attack: कुणाचं घड्याळ, कुणाचं पाकीट, छिन्नविछिन्न जवानांची ओळख कशी पटली?

नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या 40 शहीद जवानांची ओळख त्यांचे आधार कार्ड, आयडी कार्ड आणि इतर सामानांच्या माध्यमातून करण्यात आली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवानांचे शरीर अक्षरश: छिन्न-विछिन्न अवस्थेत विखुरले गेले. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे खूप कठिण झाले होते. त्यामुळे या जवानांची ओळख त्यांच्याजवळील कागदपत्रांनी करण्यात आली.

14 फेब्रुवारीला गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. या हल्ल्यात देशाचे एकूण 40 जवान शहीद झाले.

हा स्फोट झाल्यानंतर जवान ज्या गाडीत होते त्या गाडीचे तुकडे रस्त्यावर सर्वत्र पसरलेले होते. यावरुन या स्फोटाची तीव्रता लक्षात येते. स्फोटानंतर काही काही जवान जागेवरच शहीद झाले. या जवानांचे शरीर हे स्फोटाच्या तीव्रतेमुळे अक्षरश: छिन्न-विछिन्न अवस्थेत विखुरले होते. जवानांच्या रक्ताने रस्ता माखलेला होता. अशात या शहिदांची ओळख होणेही शक्य वाटत नव्हते.

शहीद जवानांजवळील कागदपत्रे, सामान याने त्यांची ओळख करण्यात आली. या सर्व जवानांची ओळख त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, आयडी कार्ड याने करण्यात आली. तर काहींची ओळख त्यांच्या बॅगमध्ये किंवा खिशात असलेल्या सुट्टीच्या अर्जाद्वारे करण्यात आली. जवानांच्या हातावरील घड्याळ आणि त्यांच्या पाकिटावरुन सहकाऱ्यांनी त्यांची ओळख केली. सीआरपीएफच्या या ताफ्यात 78 गाड्या होत्या, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

वाचा : Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?

पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं

Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाला कोणत्या राज्याची किती मदत?

Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी

पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कामाला लागलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *