कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीच्या समितीतून भूपेंद्रसिंग मान बाहेर

त्या समितीतूनच आता भूपेंद्रसिंग मान बाहेर पडले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:59 PM, 14 Jan 2021

नवी दिल्लीः कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या 4 सदस्यांच्या समितीतून 1 सदस्य बाहेर पडले आहेत. भूपेंद्रसिंग मान यांनी स्वतः ला कृषी कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमधून वेगळं केलंय. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि सरकारमध्ये बातचीत करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केलीय. त्या समितीतूनच आता भूपेंद्रसिंग मान बाहेर पडलेत. (Punjab Bhartiya Kisan Union Announced To Separate Bhupendra Singh Mann From The Organization)

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या चार सदस्यीय समितीमधून भारतीय किसान युनियनचे (BKU) अध्यक्ष भूपेंद्रसिंग मान बाहेर पडल्यानंतर आता भारतीय किसान युनियननेही त्यांना संघटनेपासून वेगळे केलेय. त्यामुळे शेतकरी संघटनेतच वाद वाढण्याची परिस्थिती निर्माण झालीय. या संपूर्ण प्रकरणाबाबत भारतीय किसान युनियनने पंजाबच्या खन्ना येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकरी नेते भूपेंद्रसिंग मान यांना संघटनेतून काढून टाकत असल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत भारतीय किसान युनियनने गुरुवारी एक अधिकृत निवेदन देऊन भूपेंद्रसिंग मान यांना संघटनेतून काढून टाकण्यास सांगितले. तत्पूर्वी शेतकरी नेते भूपेंद्रसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून राजीनामा दिल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली. सध्या या विषयावर मान यांचा कोणताही प्रतिसाद नाही.

‘मान यांचा यापुढे BKU शी संबंध नाही’

पंजाबच्या खन्ना येथील पत्रकार परिषदेत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलदेवसिंग मियांपूर यांनी जाहीर केले की, त्यांनी आपले राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्रसिंग मान यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत आणि आता त्यांचा संघटनेशी कोणताही संबंध नाही. त्याच वेळी भूपेंद्रसिंग मान सुप्रीम कोर्टाच्या समितीतून बाहेर पडल्यापासून गायब आहेत.

‘आता आणखी तीन सदस्य राजीनामा देतील’

शिरोमणी अकाली दलाचे नेते माजिंदरसिंग सिरसा यांनी म्हटले आहे की, भूपेंद्रसिंग मान यांनी गुरुवारी 4 सदस्य शेतकरी समितीचा राजीनामा दिलाय, लवकरच अन्य तीन सदस्यही राजीनामा देतील. सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या आदेशानुसार मान यांना समितीचे सदस्य केले होते. शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड देण्यासाठी कोणीही तयार नसल्याचे त्यांच्या राजीनाम्यावरून स्पष्ट झालेय.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या; मोदीजी मोठे व्हा: शिवसेना

कृषी कायदे रद्द होणार नाहीच, इतर पर्याय असतील तर द्या; केंद्र सरकार भूमिकेवर ठाम

Punjab Bhartiya Kisan Union Announced To Separate Bhupendra Singh Mann From The Organization