पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची 23 लाखांना फसवणूक

पंजाबमधील पटियालातून काँग्रेस खासदार असलेल्या परनीत कौर यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी स्वतःला बँक मॅनेजर असल्याचं सांगत आरोपीने फोन केला होता

Punjab Chief Minister Wife, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची 23 लाखांना फसवणूक

चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Punjab CM Amrinder Singh) यांच्या पत्नी परनीत कौर (Preneer Kaur) यांची 23 लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. स्वतःला बँक मॅनेजर म्हणवणाऱ्या ठकसेनाने परनीत यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ही रक्कम काढून घेतली.

पंजाबमधील पटियालातून काँग्रेस खासदार असलेल्या परनीत कौर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. आरोपीने आपण बँक मॅनेजर बोलत असल्याचा फोन परनीत यांना केला होता. त्यावेळी परनीत संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. वेतन जमा करण्यासाठी त्याने परनीत यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली.

परनीत कौर यांच्या बँक अकाऊण्ट नंबरसोबतच एटीएम पिन, सीवीसी नंबर आणि ओटीपी (वन टाईम पासवर्ड) मिळवण्यातही आरोपी यशस्वी झाला. खात्यातून 23 लाखांची रक्कम काढल्याचा एसएमएस परनीत यांना आला, तेव्हा त्यांना या फसवणुकीविषयी समजलं.

फोन कॉलची पडताळणी करुन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील
रांचीतून आरोपीला अटक केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *